मदरसांच्या आधुनिकिकरण योजनेअंतर्गंत सहायक अनुदानासाठी अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका) दि. 4 :- राज्यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्या मानधनासाठी सहाय्यक अनुदान सन 2021-22 साठी शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा मदरसांकडून अल्पसंख्यांक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 मध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमूना कागदपत्राची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ज्या नोंदणीकृत मदरशांमध्ये पारंपारिक, धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते त्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासकीय अनुदान घेण्याची मदरसांना इच्छा आहे त्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी केले आहे.
विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांसाठी मानधन. पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्या तरतूदीनुसार मदरसामध्ये नियुक्त केलेल्या जास्तीत जास्त तीन डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी जास्तीत जास्त 2 लाख इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.
मदरशांच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व
डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स इ. प्रयोगशाळा साहित्य या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या पायाभूत या सुविधा आहेत
या योजनेंतर्गत लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्या तसेच अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील मदरशांना प्राधान्य देण्यात येईल. ज्या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0 Comments