राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांना जीवे मारण्याची धमकी.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, पवारांच्या निवासस्थानी मुंबईमध्ये सिल्वर ओक या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने शरदचंद्रजी पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे, या बातमीनंतर पोलिसांनी त्या धमकी देणारे इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून त्यांना देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणांमध्ये गांभीर्य लक्षात घेऊन पवारांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषिक होती. शरद पवार यांचा कालच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला, त्यानंतर त्यांची हत्या करण्याबाबतचा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आता चांगलंच गांभीर्याने घेतला असून त्या इसमाचा कसून शोध सुरू आहे.
0 Comments