आणि अज़हर हाश्मी धाउन आले
औसा.दि.28उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर व पवित्र महिना रमजान मध्ये पाण्याची सोय करणे ऐवजी असलेली पाण्याची स्त्रोत बंद करून जनतेचा राग ओढवून घेतला आहे. विजेचे बिल न भरल्यामुळे वितरण कंपनीने पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतरांचे कनेक्शन कट केले आहे.त्यामुळे शहरात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पवित्र रमजान महिन्या मध्ये जाणून बुजून केलेली ही कारवाई असल्याचे येथील स्थानिक नागरिक म्हणत आहेत. यासंदर्भात पालिकेवर आरोप केला आहे की या महिन्यात आपण अशी कारवाई करू नये पवित्र महिना रमजान संपल्यानंतर अशा प्रकारची कार्यवाही करावीजनतेची पाण्याची वणवण पाहता युवा नेते अज़हर हाश्मी युवा मंचाने टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू केला असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे.
याबाबत येथील अज़हर हाश्मी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की "पालिकेने हे काम जाणून बुजून केले आहे. जनता यांना माफ करणार नाही.आम्ही सदैव जनतेसाठी तत्पर आहोत. पाण्यासाठी शक्य तितके प्रयत्न आम्ही करू.या कारवाईचा आम्ही निषेध करत आहोत."
0 Comments