शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाकरिता संबंधित बाजार समित्याशी संपर्क साधावा...संतोष सोमवंशी

 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाकरिता संबंधित बाजार समित्याशी संपर्क साधावा...संतोष सोमवंशी





महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने दि. 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट पणन लायसन्स धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु. 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात यश आलेले आहे. असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले 


याकरिता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, सातबाराचा उतारा, बँक खाते क्रमांक इत्यादी सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments