मुद्दस्सर अली डॉ. ईकबाल सय्यद यांना फूड टेक्नॉलॉजिस्ट पदवी
धाराशिव :
धाराशिवचे युवक मुद्दस्सर अली डॉ. ईकबाल सय्यद यांनी आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील M.G.M युनिव्हर्सिटी मधून त्यांनी दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी Food Technologist ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
फूड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात हे यश मिळवणे सोपे नव्हते. मात्र सततची मेहनत, चिकाटी आणि अढळ जिद्दीमुळे मुद्दस्सर अली यांनी हे ध्येय गाठले.
अन्नप्रक्रिया आणि अन्नसुरक्षा या वाढत्या क्षेत्रात आता त्यांच्यासमोर नवी दारे उघडली आहेत. सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या यशाबद्दल धाराशिवमध्ये सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. 🌿💐

0 Comments