माणसाचे मूल्यमापन त्याच्या मनामध्ये असलेल्या स्वच्छ भावनेतून होते - राजू पाटील

एम.बी.एम 24 न्युज चॅनलचा वर्धापन दिन तथा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.














औसा (प्रतिनिधी) ज्या व्यक्तीने हा सोहळा आयोजित केलेला आहे त्या व्यक्तीच्या मोठ्या मनाचा परिचय आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं.मोठ्या माणसाचे मोठे कार्यक्रम आयोजित करणे वेगळं आणि छोट्या माणसाच्या मनामध्ये अनेकांचे सन्मान करण्याची भावना येणे आणि ती भावना प्रत्यक्षात उतरण्याचे त्याने प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.औशाच्या मातीमध्ये असे चांगूलपण रुजतंय,निर्माण होतंय,मोठं होतंय ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.औशाची पत्रकारिता लातूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी पत्रकारिता आहे.येथील पत्रकारिता मध्ये एक उंची आहे,एक दर्जा आहे आणि एक मर्यादा सुद्धा आहे.आपल्या मर्यादेत राहून काम करणारे आणि सतत समाजाचे प्रश्न घेऊन सातत्याने लढणारे आमचे सर्व पत्रकार बांधव या तालुक्याला या शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.अनेक राजकारणाच्या गमती जमती सतत होत असताना सुद्धा त्या थोड्याशा बाजूला ठेवल्या तरी आपण सर्वजण हे गाव आपले आहे,हा तालुका आपला आहे या तालुक्याच्या प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक माणूस आपला आहे ही भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये जोपासून त्या सर्वांच्या कल्याणासाठी आपण काम  करणारी मंडळी आहोत.एखादा न्यूज चॅनल,एखादा वृत्तपत्र,एखादा पत्रकार किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हे त्याच्या आकारावरून कळत नसते तर त्याच्या विचारावरून आणि त्याच्या प्रत्येक समाजातल्या वागण्यावरून कळत असते.मला मुख्तार भाई चे नेहमी मनापासून कौतुक वाटते की या माणसाला पत्रकारीची आवड निर्माण व्हावी आणि या क्षेत्रात गेले पाहिजे अशा प्रकारची ओढ लागावी आणि त्या क्षेत्रामध्ये तळमळीने काम करण्याचे प्रयत्न स्वतः सुरू ठेवावा हा अनोखा प्रसंग आहे.खरंतर टेलरिंग सारख्या व्यवसायामध्ये ते काम करतात.टेलरिंग सारख्या व्यवसायामध्ये काम करीत असताना 24 तास काम असतात या कामासाठी वेळ देणे,या कामाला वाहून घेणे हे सुद्धा त्याला आवड असली पाहिजे.खऱ्या अर्थाने मी बघतो की प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला मी 50 टक्के गैरहजर असतो पण मुख्तार भाई मात्र प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात हे पत्रकारितेवर असलेले प्रेमाचे लक्षण आहेत.काही मंडळी पत्रकारितेचा दुरुपयोग करतात,करत नाही असे नाही.परंतु त्यांच्या पेक्षा सुद्धा पत्रकारितेवर प्रेम करणारी मंडळाची संख्या अधिक आहे.ही अत्यंत आशादायी आणि महत्त्वाची गोष्ट आहे.माणसाचं मूल्यमापन त्याच्या चेहऱ्यावरून नाही,तर त्यांच्याकडे असलेल्या गाडी घोड्यावरून ठरत नाही तर माणसाचे मूल्यमापन त्याच्या मनामध्ये असलेल्या स्वच्छ भावनेतून होते.मी अभिनंदन करतो तुमच्या सर्वांच्या वतीने मुख्तार मणियार यांचे की तो एक स्वच्छ मनाचा,या शहरावर,या तालुक्यावर या तालुक्याच्या मातीवर प्रेम करणारा एक अत्यंत चांगला पत्रकार आहे.उद्या भविष्यामध्ये जेव्हा औसा तालुक्याच्या पत्रकारितेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यामध्ये एक वाक्य नक्की असेल की टेलरिंग सारख्या व्यवसायामध्ये काम करणारा मनुष्य सुद्धा पत्रकारिताच्या प्रेमात पडला.त्यांनी तेथून पुढचा जीवन पत्रकारिता साठी अर्पण केले.अशा निश्चित प्रकारची नोंद भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही,अशा प्रकारची ग्वाही,अशा प्रकारची सदभावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो.

    यावेळी एम.बी.एम 24 न्युज च्या दुसरे वर्धापन दिन तथा पुरस्कार वितरण करण्यात आले.या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांमध्ये लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,एम.आय.एम.प्रमुख औसा सय्यद मुजफ्फर अली इनामदार,आरोग्य अधिकारी डॉ.आर आर.शेख यांना सामाजिक गौरव पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच 2023 चा अक्षर सेवा पुरस्कारांमध्ये पत्रकार राम कांबळे,विलास तपासे,इलियास चौधरी,संपादक मजहर पटेल यांना तर सामाजिक कार्य करणाऱ्या मध्ये उमर गुलाम हुसेन पंजेशा यांना हि एम.बी.एम 24 न्युज चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुख़्तार मणियार यांचा ऑर्बीट प्री-प्रायमरी शाळेतर्फे गौरव करण्यात आला.यावेळी मौलाना मुफ़ती याकुबसाब कासमी,इंजि.अजहर हाशमी,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,मनोगत चे संपादक राजू पाटील,पत्रकार महेबुब बक्षी,बी.जी.शेख,मुस्लिम कबीर, एड.एकबाल शेख,मुज्जमील शेख,जिशान पटेल,दादा कोपरे, संभाजी शिंदे,उमर शेख,जयहिंद पांचाळ,आत्माराम मिरकले,हारुणखां पठाण, एड.मुजक्कीर इनामदार,मकबुल मणियारी,अनवर करपुडे,फारुख करपुडे आदि उपस्थित होते.