लोकसभा मतदार संघातील एम.आय.एम. पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सय्यद इम्तियाज जलील साहेब यांना मराठा संग्राम पक्षाच्या वतीने विनाअट जाहिर पाठींबा
औरंगाबाद (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे की की, सन 2024 पासून देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे. तेव्हापासुन देशात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महागाईने उचांक गाठला असून देशात खाजगीकरण वाढत आहे. देशात पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांचा मनमानी कारभार चालु आहे. देशात लोकशाही संपुष्टात येते की, काय अशी भिती जन सामान्यांना वाटत आहे आणि म्हणुनच अशा प्रकारे चालत असलेली भा.ज.पा. ची हुकूमशाही थांबवण्याच्या दृष्टीने मोदी सरकार सत्तेपासुन दुर ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आणि म्हणुन देशात चाललेला हा अंन्धाधुन्ध कारोभार थांबवण्याकरीता तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र येवुन लोकाशाही वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आता काळाची गरज आहे. आणि सन 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून जनता जर्नाधनाच्या कृपेने आपण विजयश्री मिळावला व लोकप्रतिनीधी म्हणुन मोठया प्रमाणात लोकहिताचे कामे केली. संसदेमध्ये सामाजिक मुद्यावर आवाज उठवला आणि कोणताही जातीधर्माचा भेद न करता सर्वधर्म समभाव या भावनेतुन आपण सर्वांची कामे केली विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली (सराटी) ता.अंबड जि. जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला झाला तेव्हा आपण स्वतः त्या ठिकाणी भेटण्याकरीता आलात तेव्हा अशाप्रकारे कुठलाही भेदभाव न करता आपण जनम्जनार्धनांची सेवा करत आहात, म्हणून आपल्या सारख्या लोकप्रिय लोकप्रतिनीधींचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणुननच्च आपण तन- मन-धनाने जनता जनाधर्नाची सेवा करत आहात म्हणून आपल्या सारख्या सज्जन लोक प्रतिनिधीच्या सोबत राहण्यासाठी आमचा एक खारीचा वाटा म्हणुन आम्ही आमच्या मराठा संग्राम पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात आपणास विनाअट जाहिर पाठींबा देत आहोत. असे
भिमराव कोकाटे पाटील
संस्थापक / अध्यक्ष मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहेत
0 Comments