सोलापुर मध्ये कांग्रेसचा तुफान आलंया* विराट जनसमुदायांची राहुल गांधीनी मने जिंकली

*सोलापुर मध्ये कांग्रेसचा तुफान आलंया* विराट जनसमुदायांची राहुल गांधीनी मने जिंकली....



.महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो :लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात अमरावती आणि सोलापूर येथे कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दमदार एंट्री केली आहे सोलापूर येथे आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ते सोलापुरात आले होते.दरम्यान त्यांनी उपस्थित विराट भव्य सभेला संबोधित करताना म्हणाले की भावनिक मुद्दे आणुन जनतेची दिशाभूल मोदी करत असुन सतत खोटेच बोलत आहेत. कांग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात जनतेच्या दररोजच्या जीवन जगण्याचे उत्तर दिले आहे ते पुढे बोलताना असे म्हणाले कि गरिबी असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यातील महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये वार्षिक देणार आहे तसेच युवकांना रोजगारासाठी नोकरऱ्या देऊन त्यांनाही वार्षिक एक लाख रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले त्यासोबतू शेतकऱ्यांना हमीभाव कायदा लागू करून एक आयोग स्थापन करण्यात येऊन त्यानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबत आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी जात नि हाय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली यावेळी सभेला आलेल्या विराट जनसमुदायांने राहुल गांधी यांना भरभरून प्रतिसाद दिला सभेचा संपूर्ण परिसर टाळ्या शिट्या उत्स्फूर्त घोषणांनी दुमदुमून गेला होता   अशाप्रकारे आजची सोलापूरची सभा राहुल गांधी नी गाजवली यावेळी उमेदवार प्रणिती शिंदे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील माजी ,केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात,नाना पटोले आदी स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments