जायफळ येथे निष्काळजीपणे वाहन चालवून एकास उडवले. 





औसा. औसा तालुक्यातील मौजे जायफळ येथे वाहकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतल्याची घटना घडली.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की सकाळी 10.50 वाजता वाहन क्रमांक 24 ए डब्ल्यू 3949 एक्सयुव्ही 300 ही गाडी विशाल रमेश रानमारे राहाणार लातुर यांनी भरधाव वेगाने चालवून पंढरी लक्ष्मण पवार पन्नास वर्षे राहाणार जायफळ यांना पाठीमागून जोराची धडक दिली यात ते जखमी होऊन खाली पडले.यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतीत भादा पोलीस स्टेशन येथे शंतनू पंढरी पवार यांनी फिर्याद दिली.त्यानुसार भादा पोलीस स्टेशन कलम 106(1)281भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे.

पुढील तपास सापोनि एम एस जाधव हे करत आहेत.

गाडी निष्काळजीपणाने चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.