उमरगाच्या सहा वर्षांचा रेहान सईद मुल्ला हिने केला पहिला रोजा
मुरूम /प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. उमरगा शहरातील सहा वर्षांच्या रेहान सईद मुल्ला हिने आपल्या आयुष्यातील पहिला उपवास (रोजा)पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत -रेहान मुल्ला पहाटेच्या सेहरीपासून ते संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही आई वडिलांना तक्रार न करता तिने हा रोजा पूर्ण केला. तिच्या या जिद्दीचे आणि शहरात रेहान चे कौतुक होत आहे.
कुटुंबियांनी सांगितले की, रेहान ने स्वतःहून रोजा ठेवण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या उत्साहामुळे आणि चिकाटीमुळे उमरगा शहरातील नागरिकांना आनंद व अभिमान वाटला रमजान महिन्यात लहान वयामध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी, यासाठी रेहान मुल्ला हीचा पहिला रोजा प्रेरणादायक ठरला

0 Comments