एम.एन.एस.बँकेच्यावतीने आयोजित नागरी बँक प्रशिक्षण शिबीरास उपस्थित रहावे


 

एम.एन.एस.बँकेच्यावतीने आयोजित नागरी बँक प्रशिक्षण शिबीरास उपस्थित रहावे

- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर दि.27/08/2021

देशातील नागरी सहकारी बँका संदर्भात रिझर्व बँकेने अनेक नवीन नियमावली आणलेली आहे. केंद्र सरकारने 97 वी घटनादुरूस्ती केली. त्याविरूध्द हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या सर्वांचा नागरी सहकारी बँकाच्या व्यवस्थापनात काय बदल होणार याविषयाबरोबर के्रडिट अप्रायजर, एन.पी.ए.मॅनेजमेंट, बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची कर्तव्य या विविध विषयावरची देशातील बँकींग क्षेत्रातील प्रसिध्द मार्गदर्शक आर.बी.आय. चे निवृत्त मॅनेजर के.सी.मिश्राजी, अभ्यासक अ‍ॅड.एम.ए.मुरूडकर, अ‍ॅड.एम.एन.कुलकर्णी आदींचे विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम 28 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वा.स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज सभागृह,एमआयडीसी,लातूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर 29 ऑगस्ट रोजी या मार्गदर्शन शिबीराचा समारोप होणार आहे. या नागरी बँक प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाला आ.अभिमन्यु पवार तर समारोपाच्या कार्यक्रमाला आ.रमेशअप्पा कराड उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बँक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments