माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून पाटील परिवाराचे सांत्वन
लातूर दि.05/10/2021
लातूर तालुक्यातील निवळी येथील विकास सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक प्रतापराव पाटील (वय 64 वर्ष) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या निवळी येथील निवासस्थानी भेट देवून पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.
तसेच प्रारंभी कै.प्रताप पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राम पाटील, कुमार पाटील, माजी उपसरपंच तथा ग्रा.प.सदस्य विशाल पाटील, गणेश पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच सरपंच अंगद जाधव, बापू शिंदे, गोवर्धन साळुंके, नेताजी शिंदे, ललीत पाटील, कुमार पाटील, माजी सरपंच विष्णू रसाळ, हनमंत जगदाळे, काकासाहेब शिंदे, बबन शिंदे, रामलिंग विभूते, गोपाळ शिंदे, चतुर्भूज शिंदे, राम हरी माने, अनिल ठाकूर, कान्होबा शिंदे, माजी सरपंच भारत सिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमवेत जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, जननायक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ मुळे, कमलाकर कदम आदी उपस्थित होते.
0 Comments