आसदचा युवक संदेश जाधव यांनी घालुन दिला आदर्श ऊस शेतीचा पायंडा

 आसदचा युवक संदेश जाधव यांनी घालुन दिला आदर्श ऊस शेतीचा पायंडा 





   आसद ता कडेगाव येथील युवा शेतकरी संदेश आनंदा जाधव या युवकाने सलग सातव्या वर्षी उसाचे उच्चांकी उत्पादन घेवुन त्यांनी तरुण शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे 

   अलीकडच्या काळात तरुणाई कृषि क्षेत्रातीकडे तुच्छ भावनेने बघत असताना संदेश जाधव या युवकाने मात्र मागील सहा वर्षे एकरी १००टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले होते यावर्षी आपल्या ऊस शेतीमध्ये एकरी १३६ टनापेक्षा जास्त उत्पादन घेवून त्यांनी शेतीची यशस्वीता तरुणाई समोर मांडली आहे संदेश जाधव यांना या कार्यात  क्रांती कारखान्याचे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर व ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांचे वेळोवळी मार्गदर्शन लाभले आहे 

   संदेश जाधव यांच्या या यशातुन नवयुवक शेतकरी तरुणाईने प्रेरणा घेवुन असे यशस्वी प्रयोग आपल्या शेतात राबविले पाहिजेत  संदेश जाधव यांच्या या यशाचे परीसरातुन कौतुक होत आहे 

      चौकट 

माझ्या या सलग सात वर्षे ऊस उत्पादनाच्या यशात क्रांती ऊद्योग समुहाचे मोलाचे मार्गदर्शन व साथ लाभली आहे त्यामुळेच मी ऊस ऊत्पादनात सातत्य राखु शकलो ..... संदेश जाधव

Post a Comment

0 Comments