प्रवाशांच्या सेवेसाठी

 विशेष लेख क्र.6                                                                              दिनांक : 5  जानेवारी, 2022


 


प्रवाशांच्या सेवेसाठी





हिंगोली, दि.5 (जिमाका) : सार्वजनिक वाहतुकी संदर्भात सर्व सोयी सुविधा पुरवणे आणि खासगी वाहतुकीसाठी नियमावली तयार करून ग्रामीण महाराष्ट्रासह राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटी महामंडळाला आधुनिकतेची जोड देत लालपरीच्या माध्यामातून एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी शासन घेत आहे.


 


अ‍ॅड. अनिल परब


                                                                                                                     मंत्री,परिवहन,संसदीय कार्ये


कोरोनाच्या संकट काळात एस.टी अनेकांच्या मदतीला धावली याची दखल घेऊन टाळे बंदीच्या कालावधीत रा.प.महामंडळातील परिचालनाशी संबंधित चालक, वाहक, चालक तथा वाहक, स्थानकावरील प्रत्यक्ष प्रवाशाच्या संपर्कात येणारे वाहतूक नियंत्रक, साहाय्यक वाहतूक निरीक्षक व सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास 50 लक्ष रक्कमेचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.


 


कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन


कोविड -19 या काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवून ऑनलाईन आर्थिक व्यवहाराला चालना मिळावी म्हणून प्रवाशांसाठी कॅशलेस स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले. तसेच एसटी प्रवाशांना स्वस्त शुद्धपाणी  मिळावे, या उद्देशाने नाथ जलयोजना सुरू केली आहे.


एसटीबसचे प्रत्यक्ष ठिकाण प्रवाशांना समजण्यासाठी प्रवासी माहिती प्रणाली सुरू करणारी एसटी ही देशातील सर्वात मोठी परिवहन संस्था आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या बसथांब्यांचे / गावांचे जी पी एस तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश व रेखांशानुसार नकाशा वर स्थान निश्चित करण्यात येत आहे. तसेच ज्या आंतरराज्य मार्

Post a Comment

0 Comments