देशाच्या जडणघडण मध्ये पत्रकार व डॉक्टरांचे योगदान विसरता येत नाही शहर पोलीस आयुक्त बैजल. यांचे प्रतिपादन

 देशाच्या जडणघडण मध्ये पत्रकार व डॉक्टरांचे  योगदान विसरता येत नाही


शहर पोलीस आयुक्त बैजल. यांचे प्रतिपादन




  🔸" आदर्श पत्रकार " पुरस्काराने

ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी व सादिक इनामदार सन्मानित

  🔸पत्रकार दिनानिमित्त डॉक्टरांचा ही झाला गौरव .


सोलापूर - हीरक महोत्सव . साजरा करणारे सोलापूर  जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे आदर्शपत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम ६ जानेवारी २०२२ रोजी ११ वाजता ' पत्र महर्षी कै . रंगा अण्णा सभागृह , पत्रकार भवन , विजापूर रोड येथे शहर पोलीस. आयुक्त मा हरिष बैजल यांच्या शुभहस्ते वं अध्यक्ष अशोक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली  मोठ्या थाटाने संपन्न झाले यंदाचे पुरस्कार दै . संचार चे माजी उपसंपादक , ज्येष्ठ मुक्त पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णा , दै पुण्यनगरीचे उपसंपादक सादिक इनामदार   यांना पांच हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र , स्मृतीचिन्ह , शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ पत्रकार मा पाडूंरंग काळे यांच्य सह कोरणा महामारीच्या काळात आपला योगदान देणारे डॉ. शिरीष वळ्रांगकर ,डॉ मनिषा दत्तप्रसन्न काटीकर , डाँ  असीम असद सैफन , डॉ. शार्दूल एस. कुलकर्णी , डॉ. निसार शब्बीर शेख , यांना  सुध्दा " कोरोना योध्दा " म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .


या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून . जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, प्राचार्य इ जा तांबोळी, प्राथमिक शिक्षणधिकारी किरण लोहारे , उपस्थित होते

  पत्रकार निवड समितीचे अय्यूब  नल्लामंदू यांनी स्वागत व परिचय. करुन दिले तर    सचिव . प्रा पी . पी . कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्तविकेत पत्रकार दिनाचे महत्व विषद करून कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना व पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष स्वर्गीय लतीफ नल्लामंदू यांना श्रद्धांजली वाहिली.

 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  शहर पोलीस आयुक्त मा हरिश बैजल यांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकाराना  शुभेच्छा देत मार्गदर्शन करीत म्हणाले . कोरोना काळात_देशात वृत पत्रांचा , डॉक्टरांचा तसेच पोलीस कर्मचा र्‍यांचा  फार मोठे योगदान आहे  त्यांनी या भयानक काळात केलेल्या अथक पारिश्रम  विसरता येत नाही , पत्रकारां चा लिखाण तेजदार तलवारी सारखं असत त्याला खरी पत्रकारिता मानली गेली आहे देशाच्या विकासात , जडणघडण मध्ये  पत्रकाराचा मोठा वाटा असतो पत्रकार .समाजात प्रत्येक चांगले कामा केल्याने त्यांचा सत्कार होत असतो, आज पत्रकार दिनानिमित पत्रकार संघाच्या वतीने दोन पत्रकारांचा व डॉक्टरांचा गौरव एकच व्यासपीठावर . होत आहे हे अभिनंदानाची गोष्ट आहे . चांगल्या कामाचे कौतुक करणे , त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांना पुढील कामासाठी प्रेरणा  मिळते या साठी समाजात चांगल्या कार्य करणाऱ्यांचे कौतुक केलेच पाहिजे असे प्रतिपादन केले, 

   , या वेळी सह सचिव अबूबकर नल्लामंदू, विश्वनाथ व्हनकोरे,  श्रीशैल चिंचोलकर ,  बाळासाहेब वाघमोडे  मजहर अल्लोळी , जुंजा ,

रविंद्र नाशिककर , एम एन पटेल , ज्ञानेश्वर कुलकर्णी , देविदास उत्पात  शहा , शौकत काझी, एम एम पठाण सांजचे अविनाश कुलकर्णी , भगवान परळीकर , मनिष केत नागेश दंतकाळे, व जिल्ह याचे पत्रकार उपस्थित होते


पुरस्कार प्राप्त पत्रकार कुलकर्णी  व इनामदार व डॉ. मनिषा काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपत्ते अनुभव कथन केले.


सुत्रसंचलन  सौ. आरती काटीकर मॅडम यांनी केले तर आभार  उत्पात यांनी मानले 




       


Post a Comment

0 Comments