व्हिलेज म्युझिक क्लब संगीत क्षेत्रातील पथदर्शी संस्था

व्हिलेज म्युझिक क्लब संगीत क्षेत्रातील पथदर्शी संस्था




व्हिलेज म्युझिक क्लब आलमला, संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी वाहून घेतलेली अग्रनी  संस्था आहे. ग्रामीण तशेच देशाच्या शहरी भागातून अविरत संगीताचे कार्य सुरू आहे. लेक्चर डेमाॅनस्ट्रेशन, गावागावातून कार्यक्रमाचे आयोजन तसेच आॅन लाईन कार्यक्रमात सहभाग, असे अनेक उपक्रम वर्षाकाठी जवळजवळ 75 कार्यक्रम केले जातात. भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात पोहंचल पाहिजे हा एक मात्र उद्देश्य. शास्त्रीय संगीत ही एक आपल्या देशाची समृद्ध परंपरेतील अनमोल विधा तिच संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. पाच हजार वर्षांचा इतिहास  असलेल्या व आपल्या पूर्वजांनी संशोधन करून ते आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. जे संगीत मन, बुद्धि व शरीरावरती सकारात्मक ऊर्जायुक्त परिणाम करते, ज्या मध्ये योगीक व ध्यान धारणा, एकाग्रता, तान तनावापासून मुक्ती, शांती, आनंद व उच्चतम चेतनेची अनुभुती (God concessions) प्राप्त होते. संगीत चिकित्सा हा देखील खूप मोठा विषय आहे. जगातील अनेक विद्यापीठात या विषयावर संशोधन झाले आहे व ते मेडिकल इंडस्ट्री मध्ये खूपच उपयुक्त ठरले आहे. मला पण संगीत कार्यक्रमानिमित्त जगभर प्रवास व अमेरिकेत(USA) दहा वर्षे वास्तव्याचा योग आला. पाश्चात्य देशात आपल्या संगीताकडे त्यांचा पहाण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व शिकण्याची उत्सुकता खूप भावली. आपल्या देशातील अध्यात्मिक गुरुंची गेल्या शतकातील जगभरातील चळवळ, अध्यात्म, योग, आयुर्वेद, गंधर्व वेद(संगीत) या विषयांचा जगभरात प्रचार प्रसार केला त्या मुळे नविन कलाकारांना तिथे जाऊन कला प्रस्तुत करण्यासाठी पोषक पार्श्वभूमी तयार झाली व कार्य सोपे झाले. याचीच फलश्रुती म्हणजे आज भारतीय कलाकार जगभर फिरताना दिसतात. विदेशातील रोचक अनुभवांची शिदोरी खूप मोठी आहे सर्व काही इथे नमुद करणे कठीण आहे पण एक प्रसंग बाॅईजी(Idaho) या शहरात हीवाळ्यातील कडक थंडी व बर्फ बारी चे दिवस, तीन महीने या शहरात राहण्याचा योग आला. एके दिवशी पहाटे चार वाजता महर्षी महेश योगी यांचे शिष्य बायरन होटल वरती आले व मी आणि तबला वादक गणेश प्रसाद गुप्ता यांना जागे करुन आपल्याला कार्यक्रमासाठी निघायचे आहे. त्यांना खुल्या मैदानावर एक बंगलो बांधायचे होते व त्याचे भूमिपूजन करावयाचे होते ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने, कारण शास्त्रीय संगीत हा सामवेदाचा उपवेद आहे आणि त्याचे महत्व आपल्या पेक्षा त्या लोकांना जास्त माहित आहे. पण काय अनुभव, 5.30 am ला कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांसाठीच कडाक्याची थंडी, मंद, गार वहानारा वारा, आवाज खुला करण्यासाठी गरम काॅफी ची मदत, भैरवाच्या कोमल स्वरांनी सुरुवात झाली, क्षितिजावर सुर्योदया अगोदरची लाल रंगाची कोमल किरणे गायकीला साथ देत होती. कार्यक्रम जवळ जवळ दिड तास चालला. निसर्गाच्या सान्निध्यातील तो अविस्मरणीय अनुभव कायमस्वरूपी अंतर्मनात घर करुन राहीला. अमेरिकेतून परतल्या नंतर मी निर्णय घेतला की आलमला, माझे जन्म गाव इथेच राहून संगीताचे कार्य करायचे. सोशल मेडिया मुळे ते सोपे पण झाले आहे. युट्यूब चॅनेलवर 2000 विडिओ व अनेक संगीत उपयोगी माहिती असलेल्या विडिओचा संग्रह. आतापर्यंत 7,50,000/- लोकांनी चॅनेल ला भेट(views) दिली आहे. WhatsApp वरती 500 ग्रुप चा मेंबर, फेसबुक वर स्वतः अॅडमिन असलेले बरेच ग्रुप व बाकिच्या अनेक मेडिया प्लॅटफॉर्म वरती प्रझेंस, आॅन लाईन व आॅफ लाईन प्रस्तुतिकरण से व्हिलेज म्युझिक क्लब आलमला चा उद्देश्य जास्तीत जास्त  लोकांपर्यंत संगीत पोहंचविने सफल होत आहे.

वेदांग धाराशिवे.


Post a Comment

0 Comments