पावसाने दडी मारली चिंताग्रस्त शेतकऱ्यांची आंतरमशागतीची लगबग

 पावसाने दडी मारली

 चिंताग्रस्त शेतकऱ्यांची आंतरमशागतीची लगबग






 औसा प्रतिनिधी


 खरीपाच्या पेरणीनंतर मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे पंधरा दिवसापासून दररोज सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे जमा झालेले ढग पुढे सरकत असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे यावर्षी प्रतिका नक्षत्रापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली तर काही शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती रखडल्याने व पेरणीसाठी शिवार तयार नसल्यामुळे उशिरा पेरणी करण्यात आली आहे पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे कोळी पिके को मोजण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकूण लागवडी योग्य क्षेत्राच्या 70 ते 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनी उडीद तूर आणि मग या पिकाची पेरणी केली आहे जमिनीमध्ये ओलावा असला तरी मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीत असलेल्या खरीप पिकासाठी पावसाची नितांत गरज आहे आकाशात पावसाचे दररोज ढग जमा होत असताना सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे ढग पुढे पुढेच सरकत असल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची लगबग सुरू केली आहे. पशुधनाची घटलेली संख्या लक्षात घेता अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी व मशागतीची कामे करीत आहेत परंतु आंतर मशागतीसाठी बैल बारदानाच आवश्यक असल्याने खरीप पिकांची कोळपणी, खुरपणी इत्यादी आंतरमशागती करण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. कशाही परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग पिकांची वाढ व्हावी म्हणून आभाळाकडे नजरा लावून अंतर मशागती करण्यात गर्क झाला आहे.

Post a Comment

0 Comments