अक्षरा मस्के चे आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश 



बीड (प्रतिनिधी): अक्षरा तत्त्वशील मस्के या विद्यार्थिनीने आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.
अक्षरा मस्के ही बीड शहरातील राजुरी वेस भागात राहणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची नात असून ती ब्ल्यूरिज पब्लिक स्कूल, हिंजवडी, पुणे येथे शिक्षण घेत आहे. अभ्यासात हुशार असल्याने तिने इयत्ता दहावीच्या आयसीएसई बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिने मिळविलेल्या या यशामुळे तिच्यावर शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, बीड-पुणे येथील गंगाधरे-मस्के परिवार, नातेवाईक, मित्रआप्तेष्ट यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.