इ.३री ते १२ वी च्या अभ्यासक्रमात मनुस्मुर्तिचा उल्लेख...

अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजाचा कडाडून विरोध .



सोलापूर-दि. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विभागाने नव्या वर्षासाठी जाहीर केला त्यात इ.३ री ते १२ वीच्या 
 अभ्यासक्रम पाहिला तर त्यात मनूस्मुर्ति-मनाचा शोल्क व भगवत गीता तसेच महिलाविरोधी गंभीर असे अनेक शब्द प्रयोग करण्यात आले.त्याविरुध्द अल्पसंख्याक समाज आणि बहुजन समाज खळबळून जागे झाले.सदरची बाब निंदनीय आसून निषेधार्य आहे.त्याचा निषेध नोंदवून शालेय शिक्षण विभागाचा (शासनाचा) निषेध करत मनूस्मुर्ति हा शब्द अभ्यास क्रमातून वगळ्यात यावा तसेच ७ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच इ.१ ली च्या वर्गात प्रवेश देण्यात यावा ही अट रद्द करण्यात यावी
व पूर्वी प्रमाणे इयता पहिलीच्या प्रवेशासाठी पांच वर्षे ठेवण्यात यावे . व उर्दू माध्यमाच्या शाळेत पवित्र पोर्टल द्वारे भरण्यात आलेल्या मराठी माध्यमाचे शिक्षकोची नियुक्ती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी
 राजमहल हाॅल मध्ये शन दि.८ जून २०२४ रोजी डाॅ.मौलाना अझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वेलफियर असोसियनच्या वतीने एक दिवसीय शिबीराचे अयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रम हाजी बशीर शेख ( डी.के) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ हारुण रशीद बागवान निवृत्त विस्तार अधिकारी बशीर इंडीकर ,हारुण करकमकर सर,मुस्ताक कानकुर्ती, ज्येष्ठ साहित्यिक अय्युब नल्लामंदु, प्रा डॉ .शफी चोपदार , सौ मर्सत बिजापूरे , व सदर संघटनेचे अध्यक्ष एम डी शेख यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.त्यावेळी श्री शेख यांनी शासनाच्या या आरमूठ्या धोरणाला कडाडून विरोध केला.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन मोईज शेख , यांनी केले तर शफी चितापूरे यांनी अभार मानले.सदर कार्यक्रमास अनेक अल्पसंख्यांक संस्था चालक व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्राचार्य व मूख्याधापक मोठ्या प्रमाणात उपस्तित होते.

अल्फिया पठाण चा सत्कार

सदर कार्यक्रमात नीट परिक्षेत ९७.३३ गूण घेऊन उतीर्ण झालेल्या अल्फिया पठाण या विद्यार्थींनीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रा.डॉ . शफी चोपदार (उपाध्यक्ष नूर चॅरिटेबल ट्रस्ट ) यांनी अल्फिया पठाण हिस वैद्यकीय शिक्षण प्रवेश घेण्यासाठी पहिल्या वर्षिचा फी देण्याचे जाहीर केले. त्यामुळे नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी व सर्व सदस्यांचे टाळया वाजवून अभिनंदन करण्यात आले .