तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बीडमध्ये यावे - एस.एम.युसूफ़
बी.के. कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटला आग्रह
बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बी.के. कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटने बीड मध्ये यावे. येथे एमआयडीसी हव्या त्या प्रमाणात नसल्याने तसेच इतर उद्योगधंदेही नसल्याने जिल्हाभरातील सुशिक्षित तरुण-तरुणींना एक तर कुठेतरी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते किंवा बेरोजगार होऊन फिरावे लागते. जिल्ह्यातील हे चित्र पाहता औरंगाबाद येथील तरुण-तरुणींना अवघ्या एक ते दोन वर्षाच्या कोर्स नंतर शंभर टक्के नोकरीची हमी देणारे बी.के. कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट ने बीडमध्ये येऊन येथेही शाखा सुरू करावी आणि येथील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा आग्रह औरंगाबाद येथील मुख्य शाखेत भेट दिल्यानंतर मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बी.के. पठाण आणि प्राचार्य दीपक गायकवाड यांच्याकडे केला असता दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच कॉलेजला भेट दिल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सलमान खान पठाण, शेख मुबिनुद्दीन आणि शेख जाकीरुद्दीन उपस्थित होते.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, दहावी-बारावी नंतर इतर कोणतेही शिक्षण घ्यायचे म्हटल्यावर त्यावर अफाट खर्च करावा लागतो आहे. शिवाय नंतर नोकरी किंवा रोजगार मिळेलच याची शाश्वतीही राहिलेली नाही. मात्र फायर व सेफ्टी डिप्लोमा अत्यंत कमी पैशात होतो, वर्ष कमी लागतात तसेच कोर्स केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातही पटकन नोकरी मिळते. तसेच विदेशात जाऊन नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांना विदेशात जाऊनही नोकरी करता येते. हा डिप्लोमा झाल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनच नोकरीची हमी घेऊन नोकरी उपलब्ध करून देते. औरंगाबादच्या बी.के. कॉलेज ने सन २००८ पासून आजपर्यंत हजारो तरुणांना देश-विदेशात नोकरी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच आता शासकीय-प्रशासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, एमआयडीसी एरियातील कंपन्यांसह मोठ मोठी हॉटेल्स, मॉल्स, चित्रपटगृहे, मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट येथेही हा कोर्स केलेल्या तरुण-तरुणींना हमखास नोकरी मिळणार आहे तसेच फायर अँड सेफ्टी यंत्रणा व फायरमॅन शिवाय वर उल्लेख केलेल्या एकाही वास्तूला बांधकाम परवाना सुद्धा मिळणार नाही असे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे पाहता बी.के. कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट ने बीडमध्येही आपली शाखा सुरू करून येथील तरुणांना नोकरी उपलब्ध करून द्यावी. असा आग्रह मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी संस्थेचे अध्यक्ष बी.के. पठाण तथा प्राचार्य दीपक गायकवाड यांच्याकडे केला आहे. त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच बीड मध्ये येऊन पाहणी करू असे आश्वासन दिले आहे.
0 Comments