चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा येथे उर्दू दिवस साजरा*

 *चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा येथे उर्दू दिवस साजरा* 




सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा येथे उर्दूचे प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या पुण्यतिथीनिमित्त उर्दू दिवस साजरा करण्यात आल. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हाजी बशीर अहमद बागवान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक मन्नान शेख, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जे. बी. बागवान उपस्थित होते. 

प्रारंभी संस्थेची व शाळेची माहिती मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी दिली. यावेळी मन्नान शेख यांनी उर्दू भोषच्या महत्व सांगितले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिर्झा गालीब यांचे गजल सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खतिब उम्मे हबीबा यांनी केले तर आभार चौधरी यास्मीन यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments