अ.भा. उर्दू साहित्य समिती तर्फे उर्दू दिवस साजरा उर्दू भाषा समाजात प्रेम वृध्दीगत करुन अतुट नाते निर्माण करणारी भाषा प्रा.इसाक मुजावर – प्रेरक वक्ते व प्रशिक्षक


अ.भा. उर्दू साहित्य समिती तर्फे उर्दू दिवस साजरा

उर्दू भाषा समाजात प्रेम वृध्दीगत करुन अतुट नाते निर्माण करणारी भाषा

प्रा.इसाक मुजावर – प्रेरक वक्ते व प्रशिक्षक





उर्दू भाषा कोणा एका समाजाची भाषा नसुन सर्व समाजात प्रेम वृध्दीगत करुन अतुट नाते निर्माण करणारी भाषा आहे.  उर्दू भाषा राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणारी भाषा आहे असे गौरव उद्गार प्रेरक वक्ते, प्रशिक्षक व समुपदेशक प्रा.इसाक मुजावर यांनी काढले.  ते अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीतर्फे उर्दू दिना निमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते.   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूरातील सुप्रसिध्द कवि बशीर परवाज हे होते.  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य ई.जा. तांबोळी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे विश्वस्त प्रा.रियाज वळसंगकर यांनी सर्वांचे स्वागत करुन पुरस्कार देण्यामागचा हेतु विशद केला व संस्थेने आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली.  मातृभाषा वेगळी असताना हि उर्दू भाषा अवगत करुन त्यावर प्रेम करणाऱ्या आनंद रघुनाथ देशपांडे यांना उर्दू मित्र पुरस्काराने तर उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करुन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिल्याबद्दल आसिफ इक्बाल शेख तर साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल इरफान कारीगर यांचा प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख पाच हजार, शाल व श्रीफळ देऊन जीवन गौरव पुरस्काराने यथोचित सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना बशीर परवाज म्हणाले की, उर्दू भाषा हि आपल्या देशात जन्मलेली भाषा असुन ती मने जोडणारी, प्रेम व बंधुत्व निर्माण करणारी भाषा आहे.  डॉ.गोपीचंद नारंग यांनी या भाषेला उतुंग शिखरावर पोहोचविले आहे.   याप्रसंगी पुरस्कार विजेत्यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष ऍ़ड.यु.एन.बेरिया यांचे हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमास विकार शेख, म.शफी कॅप्टन, प्रा.हारुण बंदुकवाला, नासीर आळंदकर, जावेद उस्ताद, याकुब मंगलगिरी, प्रा.जब्बार शेख, रफिक नल्लामंदु सह संस्थेचे पदाधिकारी व साहित्य प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.रियाज वळसंगकर यांनी केले तर म.हुसेन बक्षी यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments