युवा नेते हनमंत भैय्या राजट्टे यांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त 38 विद्यार्थ्यांना सायकल वाटप..
औसा प्रतिनिधी
औसा येथील युवा उद्योजक व युवा नेते हनुमंत प्पा राचट्टे यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त औसा शहरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना लवकर शाळेत जाता यावे आणि घरापासून शाळेपर्यंत पायी जाण्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन हणमंत भैय्या मित्र मंडळाच्या वतीने 38 व्या वाढदिवसानिमित्त साईप्रसाद हॉटेल येथील एका कार्यक्रमांमध्ये विविध शाळेतील 38 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप ह भ प दत्तात्रेय पवार गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिप्पणप्पा राचट्टे , माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,राष्ट्रवादीचे युवा नेते सुलेमान शेख, रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रविशंकर राचट्टे ,समृद्धी आटाचे संचालक ईश्वराज औटी, धम्मदीप जाधव, जगदीश स्वामी, भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष शिवरुद्र मुरगे,
मंगेश जाधव, बाळू ढोले, वारकरी शिक्षण संस्थेचे अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास नरहरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकातून सांगितला. यावेळी सर्वश्री सुलतान शेख, संपादक राजू पाटील, माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, ह भ प दत्तात्रय पवार गुरुजी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करून हनुमंत भैया मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व श्री विकास नरहरे, सुलतान शेख, अविनाश पवार, इमरान सय्यद, दर्शन मसलेकर, ऍड दीपक राठोड, किशोर पारोडकर, यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शहरातील विद्यार्थी माता, पिता, पालक यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments