सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास यश तुमचेच... प्रा. डॉ.मकबूल बरोटे महदविया यंग सर्कल औसा मार्फत आयोजित सत्कार समारंभात मान्यवरांचे विचार

 सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास यश तुमचेच...  प्रा. डॉ.मकबूल बरोटे 

  महदविया यंग सर्कल औसा मार्फत आयोजित सत्कार समारंभात मान्यवरांचे विचार





औसा (म.मुस्लिम कबीर)  शिक्षण क्षेत्रात केवळ पारंपरिक शाखांसाठी प्रयत्न न करता आधुनिक आणि नव नवीन शाखांत प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन आझाद महाविद्यालय औसा चे प्रा. डॉ. मकबूल बरोटे यांनी सांगितले.ते औसा येथील महदविया यंग सर्कल मार्फत आयोजित दहावी, बारावी व  वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या  विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी महदवी समाजाचे ज्येष्ठ अब्दुल गनी करपुडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर चे कवी अब्दुल गफार मुंगले उपस्थित होते. अब्दुल गफार मुंगले यांनी सांगितले की, विद्यार्थांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,अभ्यासात टेक्निक्स चे वापर करावे.यश हे वेळ आणि कौशल्याच्या आधीन आहे.असे सांगितले.

 समाजा मार्फत विद्यार्थ्यांचे कौतुक आणि सन्मान हे त्यांच्या भविष्यातील प्रेरणादायी क्षण असतो म्हणून महदविया यंग सर्कल औसा आणि उमर भाई पंजेशा यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. उमर भाई पंजेशा व  त्यांचे मित्र हे निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करीत आहेत.ज्या समाजात अशा तरुणांचा समावेश आहे तो समाज निश्चितच अग्रेसर राहतो.असे विचार ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद मुस्लिम कबीर यांनी व्यक्त केले. महदविया यंग सर्कल चे सचिव उमर भाई पंजेशा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील यशस्वी विद्यार्थांचे कौतुक करून त्यांना पाठबळ देण्याचे काम या संघटने मार्फत करण्यात येत आहे.यामुळे समाजातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास वाढला आहे. यावेळी भारत सरकार मार्फत नोटरी म्हणून नियुक्त झाल्या बद्दल ॲड. मकबूल हुसेन अलुरे यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन आरेफ मन्यारी यांनी केले तर आभार ॲड. वसीम करपुडे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी व्यासपीठावर प्रा. अब्दुल वहाब मल्लेभारी,कवी जिलानी मुल्ला,डॉ. गौसपाशा तत्तापूरे, इमाम कासीम करपुडे, जब्बार करपुडे, आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्या साठी 

जिलानी हिप्परगे,जिलानी करपुडे,मुबिन करपुडे,इब्राहिम तत्तापूरे,मैनुद्दीन करपुडे,यासीन करपुडे,जावेद मुल्ला, कामरान हावरे,अमन करपुडे, खुंदमिर अलूरे, नियामत लोहारे,फारुक करपुडे,इरफान बरोटे, जाफर कुमारकिरी, अल्ताफ करपुडे आदिनी परिश्रम घेतले.





MD.MUSLIM KABIR,

Latur Distt. Correspondent,

URDU  MEDIA 

Email, alkabir786@gmail.com

Cell- 09175978903/8208435414

Post a Comment

0 Comments