*राजीव गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल*
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर चा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२५ या परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकाल लागला असुन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात राजीव गांधी तंत्रनिकेतन यशस्वी झाले आहे. महाविद्यालयातील विशेष प्राविण्यासह ११० तर प्रथम श्रेणीत ९५ विद्यार्थ्यी उत्तीर्ण होत नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.
राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर तंत्रनिकेतन महाविद्यालयातून मानसी अरबाळे प्रथम, श्रुती काळे व्दितीय, तर अथर्व देशपांडे तृतीय क्रमांक पटकावला आहे.
याच बरोबर (कॉम्प्युटर) संगणक अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातुन गुटे ऋतुजा ८६ % प्रथम, शिंदे योगेश्वरी ८५ % व्दितीय, जाधव सप्तमी ८४.८२% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर व्दितीय वर्षातुन मानसी अरबाळे ९०% प्रथम, श्रुती काळे ८६% व्दितीय, आखुडे रोहित ८२.१८ घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.
(इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातुन घोडके यश ८३% प्रथम, पाटील आदित्य ७५.३५% व्दितीय, दडगे चैतन्य ७७.१२ % तृतीय क्रमांक पटकावला आहे. व्दितीय वर्षातुन अथर्व देशपांडे ८८.८२ प्रथम, कृष्णा कुलकर्णी ८१.८८ व्दितीय, वृष्टी जवळगे ७८.८८ तृतीय क्रमांक पटकावला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स AI शाखा प्रथम वर्षातुन समृद्धी पवार ८४.८८% प्रथम, बिराजदार गौरवी ८०.२०% व्दितीय, श्रेया भोसले ७९.१२ % तृतीय क्रमांक पटकावला आहे.
(इलेक्ट्रिकल) विद्युत अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातुन मिटकरी केदार ७४%प्रथम, चेउलवार श्रहर्ष ७२% व्दितीय, बिराजदार श्रेयस ७०% तृतीय क्रमांक पटकावला आहे. व्दितीय वर्षातुन साठे निवृत्ती ८०.८८% प्रथम, वैष्णवी चिल्ले ७८.५९% व्दितीय, कांबळे प्रविण ७५.५०% तृतीय क्रमांक पटकावला आहे, तसेच तृतीय वर्षातुन पोर्णिमा भांगे ८५% प्रथम, भोसले गणेश ८२.१०% व्दितीय,रणखांब पल्लवी ८२%, नागेश नागुरे ८२% तृतीय क्रमांक पटकावला आहे.
(सिविल) स्थापत्य अभियांत्रिकी शाखा तृतीय वर्षातुन कटारे निखील ८९.८८% प्रथम, डिग्गीकर मयुरेश ८२.६६% व्दितीय,निकम बळीराम ८०.११% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच व्दितीय वर्षातुन तोगरे दत्ता ७१.१२% प्रथम, ढगे अभिषेक ७०.५०% व्दितीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे संचालक नंदकिशोर बावगे प्राचार्य संतोष मेतगे उपप्राचार्या योगिता बावगे- मेतगे आयटीआय प्राचार्य सोनहिवरे एम जी, प्रा पाटील डी पी, प्रा पंचाक्षरी एस एम, प्रा गायकवाड एस एन, , प्रा ताडके के डी, प्रा कोरे आर एस, प्रा पोतदार एस , प्रा गवळी बी आर, प्रा मुंदडा ए एम, ,प्रा वाडकर के एस, प्रा त्रिपती के, प्रा कुलकर्णी पी, ग्रंथपाल सवाई मनदीप, पाटील ए आर, इंद्राळे आय एस,बावगे एन आर,कांबळे आदींनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments