औसा शहरात चार दिवस आड पाणी नियमित सोडावे -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरात जवळपास
५० कोटी खर्चुन माकणीवरुन पाईपलाईन आणण्यात आली. तसेच तावरजा प्रकल्पातून पाणी
चालु करण्यात आले परंतु नागरीकांच्या नळापर्यंत पाणी पोहचत नाही. शहरात एक महिन्यातून
एकदा पाणी येते. यामुळे कोट्यावधी खर्च करुनही शहरातील नागरीकांच्या घश्याला कोरड पडली
आहे. नागरीकांना भटकंती करुन अथवा विकत पाणी घेऊन चालवावे लागत आहे. तसेच पुर्वीच्या
बांधलेले विंधन विहिरी (बोअर) हे बंद स्थितीत आहेत. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता
माकणी येथे मोटार बिघडली आहे बंद आहे तसेच पाईपलाईन फुटली आहे अशी उत्तरे दिले जातात.
तसेच जुन्या शहरात लोकांना व नविन वस्तीत नविन पाईपलाईन होत आहे. नगर पालिकेत वेळेवर
नळपट्टी भरुनही नागरीकांना पाणी मिळत नाही व नविन पाईपलाईनच्या नावाखाली नागरीकांची
हेडसांड करण्यात येत आहे. तसेच शहरातील मुख्य गटारी व स्वच्छेतेवर लक्ष देण्यात यावे.
तरी वरील प्रकरणी त्वरीत लक्ष देवून शहरातील नागरीकांना चार दिवस आड पाणी सोडण्यात यावे व शहरात स्वच्छता ठेवण्यात यावी व घंटागाडी नियंत्रण करण्यात यावे अन्यथा एम.आय.एम.च्या वतीने नगर पालिकेसमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
0 Comments