गैबीपीर उर्दू प्रा. शाळेत स्वतंत्र्य दिन साजरा

 गैबीपीर उर्दू प्रा. शाळेत स्वतंत्र्य दिन साजरा





सोलापूर- गैबीपीर उर्दू प्रा. शाळेत स्वतंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . यावेळी ध्वजारोहण प्रमुख पाहुणे सदाशिव व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आले . पाहुण्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अ . मजीद शेख यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदारभाई नदाफ होते . शाळेतील विध्यार्थीने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले . 

यावेळी सदाशिव व्हनमाने, मुश्ताक कुरेशी, यासीन शेख, व दै. आज का आनंदचे वरिष्ठ पत्रकार अमीन खान पुणे, संस्थेचे अध्यक्ष हाजी के . बी नदाफ यांनी आपले मनोगत व्याक्त केले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते परवेज सौदागर, के बी नदाफ यांच्यावतीने रोख बक्षिसे देण्यात आली . सरदार नदाफतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात माजी नगरसेविका वहिदाबी शेख, उबेदुल्लाह शेख, हाजी मो. अनिस नदाफ, खालीद शेख, अकन्टंट रेहान शेख, गायक अ. रहमान शेख, पैगंबर मोमीन, लुकमान शेख, तौफिक नदाफ, ड्रिम फाउन्डेशनचे वेदांन, फेरोज बागवान  आदि पालक उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीन चाँदा, शबाना जमादार, अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, मसरत शेख, शब्बीर शेख, आफरीन शेख, सालेहा शेख, मुबीना मुच्छाले, यासीनबी शेख, रेश्मा शेख, आदिनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन निलोफर शेख यांनी केले.




Post a Comment

0 Comments