आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे युवा सम्राट मित्र मंडळाचे आवाहन...
लातूर ः युवा सम्राट मित्र मंडळ, महाराष्ट्र यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या नवरत्नांचा सन्मान करण्याचे काम युवा सम्राट मित्र मंडळ, महाराष्ट्र हे गेल्या अनेकवर्षापासून करत आले आहे. या पुरस्कार देण्यामागचा हेतु महाराष्ट्रातील गरजु विद्यार्थी जे शिक्षणापासून वंचीत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन त्यांचे आयुष्य घडविणार्या अशा शिक्षकांच्या कार्याची दखल घेवुन अनेक वर्षापासुन त्यांचा सन्मानीत करण्याचे काम पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येते.
सामाजिक क्षेत्रात आवडी-निवडी असुनच चालत नाही तर हे करतांना तन-मन-धनाने शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आयुष्य बनविण्यासाठी झटतांना बोटावर मोजण्याइतके शिक्षक पहायला मिळतात. अनेक शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेवून त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात. कांही विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, त्यांची कधी-कधी ट्युशन फिसही न घेता त्यांचे आयुष्य घडवितांना शिक्षक दिसतात. मग हेच विद्यार्थी पुढे चालून कोणी डॉक्टर होतो, तर कोणी आयपीएस होतो तर कोणी इंजीनिअर होतो. पण त्यांना घडविणार्या शिक्षकाला लोक मात्र विसरून जातात परंतू युवा सम्राट मित्र मंडळ हे एकमेव असे मित्र मंडळ आहे जे अशा शिक्षकांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा यथोचित सन्मान करते.
तरी सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या अशा शिक्षकांनी आमच्या कार्यालयाच्या पत्त्यावर आपल्या कार्याची संपुर्ण माहितीसह प्रस्ताव सादर करून आमच्याशी पत्रव्यवहार करावा. आम्ही त्यांच्या कार्याला पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न करू.
पत्ता ः शाहु चौक, मेघराज नगर, लातूर - 413512
मो.9822471854
आपला
हिराप्रकाश मिलींद कांबळे
प्रति,
मा.संपादक/जिल्हा प्रतिनिधी
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात/साप्ताहिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
0 Comments