मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉ मिर इस्हाक शेख व कॉम्रेड सोनवणेनां राज्यातील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
🔸 कॉ० विलास सोनवणे गौरव पुस्तिके साठी लेख पाठवण्याचे ही आवाहन 🔸
अ भा मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृति मंडळसंच्यावतीने अध्यक्ष डॉ इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली ८/८/२१ दुपारी नुकतेच निधन पावलेले सुप्रसिद्ध लेखक , अभा मुस्लिम मराठी साहित्य परिषदचे उपाध्यक्ष , सोशल महाविद्यालयाचे निवृत प्राध्यपक डॉ मीर इसहाक शेख व ओबीसी चळवळीचे कॉम्रेड विलास सोनवणे
*यांना आदरांजली* वाहण्यात आली , या ऑन लाईन पध्दतीने अडीच तास झालेल्या या आदरांजली कार्यक्रमात प्रा उदय मेहता , प्रा शबाना मुलां, अॅड सुनील , शरद जैस्वाल , शशिकांत सोनावणे , श्वेता दामल , [मुंबई] , डॉ राही [बुलढाणा] डॉ. बशारत [उस्मानाबाद] , डॉ अन्वर शेख [औरंगाबाद ] , अय्यूब नल्लामंदू [सोलापूर] इंतेखाब फराश [पुणे] कवि ए. के. शेख [पनवेल ] मुफीद मुजावर ,सलीम शेख [मुंबई] एस.एस. सेन , गणेश उपाध्य , समीर शेख , गिरीराज गुप्ता , श्याम घुघे , कॉ. वासुदेव , अंबादास पांचगे [लातूर] , हलीमां मुल्लां [वीट ] डॉ. मिन्ने [औरंगाबाद ] प्रा डॉ.आरिफ शेख औरंगाबाद प्रा. फारूक शेख , अबुबकर नल्लामंदू, इत्यादिनीं आपले विचार व्यक्त करुन डॉ शेख व कॉं सोनवणेनां श्रद्धांजली अर्पण केली.
व विविध प्रसंगी केलेल्या कामे, भाषणे यांची आठवणीतील प्रसंग . व अनेक पैलूं वर कथन ही केले डॉं इक्बाल मिन्नेनीं प्रास्ताविकेत दिवंगंताची माहिती देत सुत्र संचलन ही केले, या वेळी सोलापूरहून सहभागी झालेले उर्दू-मराठी साहित्य परिषदचे उपाध्यक्ष अय्यूब अ लतीफ नल्लामंदू यांनी आपले विचार व्यक्त करत म्हणाले -
आगाह अपनी मौत से कोई बशर नही।
सामान है सौ बरस का पल की खबर नही ॥
या शायरी प्रमाणे डॉ मिर इस्हाक शेख व कॉमेड विलास भाई आपल्यात आज नाहींत, ते आपल्या परीनीं जेवढा कार्य करता आला ते कार्य त्यांनी करुन स्वर्गवासी झाले परंतु त्यांनी अर्धवट सोडलेली कामे आम्हांस करायची आहे आपण या बाबींकडे लक्ष देवून त्यांची स्वप्ने पूर्ण करुन ख=या. अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करु. व त्यांनी राष्ट्रीय एकात्मते साठी केलेले त्यांचे प्रेरणादायी कार्य नवीन पिढी समोर आणू०
या नंतर डॉ. इक्बाल मिन्ने आपले अध्यक्षीय भाषनात सर्व सहभागी वक्त्यांचा . आढावा घेत म्हणाले -
कॉमेड सोनवणे आपल्या हयातीत अनेक कार्यकर्ते निर्माण केले, त्याच्यात संघटक कौशल्य होता या जोरावर त्यांनी मुस्लीम ओबीसी चळवळ् , मुस्लिम मराठी साहित्य परिषद व युवा भारती सारख्या अनेक संघटनाच्या माध्यमातून अनेक विधायक कामे करुन दाखविले याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी साहित्य क्षेत्रात आलेल्या तरुण पिढीला मोलाचे मार्गदर्शन केले आहेत.
डॉ० मिर इस्हाक शेख यांची मैत्री चे अनुभवी किस्से सांगत त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाची व त्यांनी लिहलेल्या पुस्ताकांची साविस्तर माहिती दिली. व या दोन थोर व्यक्तींचा अचानकपणे जाण्याने विधायक चळवळी ची व साहित्य क्षेत्रात कधी भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली
शेवटी डॉ इक्बाल मिन्ने व सहभागी वक्तयांनी निधन पावलेल्या दो नही मान्यवरांसाठी दीर्घ दुवा मागत इश्वर सर्वांना जन्नत मधील उच्च स्थान द्यावे अशी प्रार्थना केली
कॉ० विलास सोनवणे यांनी केलेल्या कार्य नवीन पिढीला महित व्हावा या करिता त्यांची गौरव पुस्तिका लवकरच प्रकाशित करायची आहे या करिता सर्वानी आपले लेख तातडीने पाठवण्याचे आवाहन ही मिन्ने यांनी केले आहे०
.
शेवटी शेख अन्वर जावेद यांनी आभार मानले.
0 Comments