आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी मोर्चा चे आयोजन
औसा मुख़्तार मणियार रिपोर्टर
- आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने 3 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी भादा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
- भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 45 गावे येतात. यातील बहुतांश गावामध्ये दारू, गांजा, मटका, आणि गुटखा सर्रास विकला जातो.
बऱ्याच गावातून अनेकवेळा भादा पोलीसांना निवेदने दिली मोर्चे काढले आंदोलने केली पण भादा पोलीस या अवैध धंदे वाल्याविरुद्ध कसलीच कार्यवाही करीत नाहीत. ज्या गावातून या दारूवाल्या विरुद्ध आंदोलने होतात त्या गावातील दारूवाल्यांना सांगून आंदोलन कर्त्याविरुद्ध विनयभंगाची चोरीची आणि मारामारीची खोटी गुन्हे दाखल केली जातात. म्हणजे पुन्हा लोकांनी आंदोलनेच करू नये. खोट्या केसेस मुळे पुरुष आणि महिला घाबरून गेले आहेत.
पोलीसांच्या खबऱ्याकडून गावात अशी अफवा पसरली जाते की, आंदोलन कर्त्या महिलावर आणि पुरूषावर मोठे गंभीर गुन्हे दाखल होणार असून त्यांना दोन महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यामुळे भादा अंतर्गत असणाऱ्या गावातील आंदोलनात येणाऱ्या लोकांवर प्रचंड मोठा दबाव येत आहे.
एकट्या आशीव गावात दारूमुळे चौघाचा मृत्यू झाला आहे. पण या मृत्यूची नोंद दारू पिल्यामुळे झाली नसून अंतर्गत भांडणातून मृत्यू झाला आहे अशी खोटी नोंद करण्यात आली आहे.
भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या गावात वर्षाकाठी 50 लोकांचा मृत्यू दारू पिल्यामुळे होतो. पण 50 मृत्यू नसून 250 मृत्यू होतात. कारण 50 च्या मागे त्यांचा पुर्ण परिवार असतो. एका परिवारात किमान 5 माणसे असतात. आशीव ग्रामपंचायीने अवैद्य दारू विक्रेत्यांना राशन बंद आणि ग्रामपंचायतीचे कुठलेही
कागदपत्र यापुढे द्यावयाचे नाहीत असा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे..
अवैद्य दारू विक्रेत्याविरुद्ध हद्दपारिच्या कार्यवाह्या केल्या तर कायमस्वरूपी हे दारूवाले अवैध धंदे करण्याचे बंद करतील. आम्ही भांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लिंगे यांना भेटून अवैध धंदेवाल्याविरुद्ध कार्यवाही करा असे निवेदन दिले असताना श्री.लिंगे म्हणतात की, या दारूवाल्यांनी कसे जगायचे अगोदर यांचे पुर्नवसन करा त्याच्या कुटुंबियांचा अगोदर विचार करा असे बेताल वक्तव्य त्यांनी केले, हे निषेधार्थ आहे.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. पिंगळे साहेब यांनी या अवैध धंदेवाल्याविरुद्ध कडक मोहीम चालू केली आहे. त्यांच्या मोहिमेला जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी ही धडक मोहीम राबवली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भातलवंडे साहेब यांनीही या अवैध धंद्याच्या विरुद्ध कडक कार्यवाही चालू केली आहे.
तत्कालीन लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.अरूप पटनाईक साहेब यांच्या नंतर अवैद्य धंदेवाल्याविरूद्ध कडक कार्यवाही करणारे श्री. पिंगळे साहेब हेच एकमेव पोलीस अधिक्षक आहेत. अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ म्हणून श्री. पिंगळे साहेब यांची प्रतिमा बनली आहे. पिंगळे साहेबांच्या स्वप्नातील लातूर आम्हास बघायचे आहे.
पण भादा पोलीस ठाणे हे साहेबांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. संघटनेतील माझ्या मुलींना आणि मुलांना अनेकाकडून फोन करून बाबांना सांगा की, भादा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू नका पण माझ्या मुली म्हणतात बाबा कोणाचे ऐकत नाही कारण हा ज्वलंत विषय आहे.
भादा पोलीस ठाण्याच्या परिसरातून येणाऱ्या गावाच्या तक्रारीनुसार हा 3 सप्टेंबरचा मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
हा 3 सप्टेंबरचा मोर्चा प्रदेश प्रवक्त्या सोनालीताई गुळभिले, प्रदेश सरचिटणीस रामप्रसाद दत्त, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत घवण, औसा तालुका अध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथून सकाळी 11:00 वा निघणार आहे तरी हजारोच्या संख्येनी या मोर्चास हजर रहावे.असे आव्हान
प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष
राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्षा रामप्रसाद दत्त प्रदेश सरचिटणीस नागराज साळुंके प्रदेश सेक्रेटरी संतोषीताई मोरे प्रदेश कार्याध्यक्षा अक्षय भोसले जिल्हा संघटक
सोनालीताई गुळभेले प्रदेश प्रवक्ता पुजाताई निचळे प्रदेश अध्यक्षा ब्रिक्स मानव अधिकार मिशन युवती विभाग माधुरीताई पाटीलऔसा तालुका अध्यक्षा संजय मातोळे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सुतार जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संघटना
आदि ने केला आहे
0 Comments