लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत
लातूर, दि. ०९ : जिल्हाधिकारी यांच्या आदेशनुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणाऱ्या लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत लातूर उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सोडत होणार आहे.
लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायातींपैकी २३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार असून यापैकी ११ पदे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ सरपंच पदे राखीव असतील, यापैकी १ पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३० पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी १५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहतील, यापैकी २८ सरपंच पदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील.
लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित रहावे, असे लातूरचे तहसीलदार यांनी कळविले आहे.
*****
0 Comments