पुण्यात रविवारी ऐतिहासिक काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन.

 पुण्यात रविवारी ऐतिहासिक काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन.



“फातिमाबी शेख ” प्रातिनिधीक ऐतिहासिक काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन

पुणे दि 20 : ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, पुणे जिल्हा शाखा आयोजित, पहिल्या भारतीय शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जीवनचरित्रावर आधारित कवितांचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह कवयित्री अनिसा सिकंदर शेख व कवयित्री दिलशाद यासीन सय्यद यांनी

” फातिमाबी शेख ” या शिर्षक नावाने संपादित केला असून वेदान्त प्रकाशन , डोंबिवली – मुंबई या नामांकीत प्रकाशन संस्थेने प्रकाशीत केला आहे. या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोज रविवारी रोजी सायंकाळी चार वाजता पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.



कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस हे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक मा. अॅड.शेख अय्युब इलाही , पुणे हे करणार आहेत . लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार दूरदर्शन वृत्तनिवेदक मा.मधुकर भावे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे

अध्यक्ष मिलिंद जोशी , बालभारतीचे सदस्य प्रा. मैनोद्दीन मुल्ला , प्राचार्य मकरंद वाझल , शबाना शेख (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) , ज्येष्ठ साहित्यिका ज्योस्त्ना चांदगुडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा.शरदजी गोरे, सामाजिक कार्यकर्ते हाजी नदाफ , सौ. फरजाना शेख ( विद्यमान नगरसेविका, पुणे) , ज्येष्ठ साहित्यिक सुभाषदादा सोनवणे,शरद प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक संदीप राक्षे,साहित्यिक प्रशांत वाघ , कवी – गझलकार म.सा. प .चे कार्यवाहक दिपक करंदीकर , प्रा. शमशोद्दीन तांबोळी , अध्यक्ष – मुस्लिम सत्यशोधक मंडळ , ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. हाशम इ. पटेल , केंद्रीय सचिव डाॅ.सय्यद जब्बार पटेल , केंद्रीय उपाध्यक्ष खाजाभाई बागवान , केंद्रीय कार्याध्यक्ष डाॅ. शेख महंमद रफी , विश्वस्त कवी शेख इस्माईल , महासेन प्रधान आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकाशझोत म्हणून हा ऐतिहासिक काव्यग्रंथ प्रकाशनाचा सोहळा होणार असून , या प्रातिनिधीक कवितासंग्रहात महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांच्या काव्यरचना समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. तसेच याच कार्यक्रमात कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांचा




 “संवाद हृदयाशी” व ” सांगाती ” या पुस्तकाचे तर कवयित्री दिलशाद यासीन सय्यद यांच्या ” रंग उन्हाचे ” व कवयित्री प्रा.रेखा संगारे – फाले लिखित

” तीन घडीचा डाव ” या सर्व ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. दुस-या सत्रात निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन कवी गझलकार , दिपक करंदीकर , म. सा. प. कार्यवाहक यांच्या अध्यक्षतेखाली तीस कविंना काव्यवाचनाची संधी उपलब्ध होणार आहे. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन वेदान्त प्रकाशनाच्या प्रकाशिका कवयित्री सौ. सुप्रिया निलेश कुलकर्णी ह्या करणार आहेत. तर दुस-या सत्राचे सुत्रसंचालन प्रा. डाॅ. शेख म. रफी हे करणार आहेत . प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहान ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष कवीवर्य बा. ह. मगदूम , संस्थापक अध्यक्ष शेख शफी बोल्डेकर,ग्राफीक्सकार रशीद तहसीलदार यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments