श्रीरंग भाऊ मोरे यांचे निधन....
औसा/ प्रतिनिधी : - औसा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच मराठा समाजातील चळवळीचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीरंग सदाशिवराव मोरे वय 85 वर्षे यांचे सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, एक मुलगा सुन व नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत श्रीरंगभाऊ मोरे हे माजी नगरसेवक व्यंकट नाना मोरे यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 : 00 वाजता औसा येथील मराठा समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments