संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे राज्यमंत्री- संजय बनसोडे
* ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च पदावर जावा यासाठी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे.
लातूर,दि.2 (जिमाका) -शिक्षक हा भावी पिढी घडवण्याचे काम करणारा महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या हातून दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत असे विधान पाणी पुरवठा व स्वच्छता पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील भागीरथी मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, बस्वराज पाटील- नागराळकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारत बाई साळुंखे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, जि प सदस्य श्रीमती विजया बिरादार, उषा डोंगरे, कुसुम ताई हलसे, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे, शांताबाई पाटील, शारदा ब्याळे, शीला बिरादार, सत्यकला गंभीरे , पृथ्वीराज देवसाळे, तहसीलदार रामेश्वर गोरे गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, आज या ठिकाणी 100 शिक्षकांना पुरस्कार मिळाला, खरं तर सर्वच शिक्षक गुणवंत आहेत , त्यांच्या हातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक उच्च पदस्थ अधिकारी, नेते, साहित्यिक असे अनेक महान व्यक्ती निर्माण झालेले आहेत. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यात उदगीर हे शिक्षणाची गंगा आहे म्हणून उदगीर कडे पाहिले जाते, याच मातीतून नाय डोळे सर यांच्यासारखे अनेक विचारवंत निर्माण झाले आहेत,
लातूर जिल्हातील बाला उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा दर्जेदार बनल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा सर्व वाडी तांड्या वरील शाळातुन ज्ञानार्जनाचा कार्य चोख बजावतात, शिक्षक हा लोकभिमुख असावा त्यांच्या हातून देशाची भावी पिढी निर्माण होते, मला घडवण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. आज मी जे आहे ते फक्त शिक्षकामुळे आहे, आज ज्या शिक्षकांना तालुका स्तरावरील पुरस्कार मिळाला त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी त्यांना शुभेछा, कोरोना काळातही शिक्षकांचे कार्य मोलाचे आहे असेच सहकार्य व साथ येणाऱ्या काळात लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
तुमच्या ज्या अडचणी, प्रश्न असतील ते शासन स्तरावरुन सोडवण्यासाठी मी मदत करेन, असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले . सद्याचे वातावरण सतत बदलत आहे त्यामुळे दुष्काळ, चक्रीवादळ, ढगफुटी असे प्रकार घडत आहेत, यामुळे सर्व शिक्षकांनी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.यावेळी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments