आयटा कॅलेंडर 2022' प्रकाशित

 *'आयटा कॅलेंडर 2022' प्रकाशित*







 परभणी: (प्रतिनिधी) ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) परभणी द्वारा निर्मित *आयटा कॅलेंडर 2022* नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.


सदरील कॅलेंडर चे अनावरण आयटा चे राष्ट्रीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, प्रदेशाध्यक्ष सय्यद शरीफ, राज्य सचिव मुहम्मद अतिक अहमद, अस्लम फिरोज (राष्ट्रीय सचिव) आणि इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते हैदराबाद येथे आयोजीत कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी प्रादेशिक सचिवांव्यतिरिक्त राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य तसेच सर्व जिल्हा व शहराध्यक्ष आणि सचिवही उपस्थित होते.


 या आकर्षक कॅलेंडरमध्ये अंतिम प्रेषित मुहम्मद स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम यांच्या जीवन चरित्रावर आधारित आदर्श शिक्षकांचे गुण व वैशिष्ट्ये आणि 'आयटा'ची उद्दिष्टे व कार्यपद्धती याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

  

  सदरील कॅलेंडर च्या निर्मितीत  'आयटा' वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली मुहम्मद इक्बाल पाशा (जिल्हा अध्यक्ष), साबीर शाह (जिल्हा सचिव), सिद्दीकी निसार अहमद (जिल्हा उपाध्यक्ष) व तसेच रज़ीउद्दीन खतीब (माजी जिल्हाध्यक्ष) , अफसर खान ( समन्वयक), शाहीन परवीन (महिला समन्वयक), मोहम्मद अतिक अन्सारी (शहर अध्यक्ष), शेख मोहम्मद नबील (शहर सचिव), शेख जमील (शहर उपाध्यक्ष), नूर मोहम्मद (शहर सह सचिव) आणि सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments