*खादिमानच्या कॉम्युटर इन्स्टिट्यूटच्या*
*पहिल्या बॅचमधून 14 ते 66 वयोगटातले लाभान्मित*
सोलापूर- खादिमान इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या पहिल्या बॅचमधून 14 वर्षाच्या विद्यार्थिनी, 66 वर्षाचे वयोवृध्द मशिदीचे इमाम, शिक्षक व ड्रॉपआऊट विद्यार्थ्यांनी यश नोंदविला. एका कार्यक्रमात यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिक्षणासाठी वयाची कुठलीही अट नाही व आजच्या युगात संगणकीकरणाचा शिक्षण प्रयत्येकाने घ्यावा, असे आवाहन खादिमाने उर्दू फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केला. फोरमचे सचिव डॉ.म. शफी चोबदार यांनी प्रास्ताविकात फोरमचा प्रगती अहवाल प्रस्तुत केला. ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे त्यांना संगणीकरणच्या मार्गे पुन्हा मुख्य प्रवाहात यावे असे सांगितले. अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी सांगितले की आय.टी.मध्ये करिअरसाठी अभियांत्रिकी पदवीची गरज नाही. कुठल्याही पदवीधारक या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून आय.टी.मध्ये जाऊ शकतो, असे किती तरी उदाहरणे आहेत. इंजिनिअरिंगची पदवी नसताना आय.टी.मध्ये आपले नाव लौकिक केले.
खादिमाने उर्दू फोरमद्वारा आयोजित संगणकीकरण प्रशिक्षणामध्ये मूलभूत संगणकीकरण, टॅली प्राईम, शिक्षकांसाठी विशेष पॅकेजचे आयोजन करण्यात आले होते.
नासिर आळंदकर यांनी कार्यक्रमाचे उद्देश सांगितले. फैसल कादरी, मुजम्मील बागबान व सिराज बिजापुरे यांचा आयोजनबद्दल सत्कार करण्यात आले. रफीक खानयांनी संयोजन केले व अ. मन्नान शेख यांनी आभार मानले.
0 Comments