मृत्यु नोंदणी संस्थेमार्फत मृत्यु दाखला दिला जातो ते नोंद करा

 मृत्यु नोंदणी संस्थेमार्फत मृत्यु दाखला दिला जातो ते नोंद करा 



 पंढरपूर शहरातील मुसलमानांचे थोरले कब्रस्तान वक्फ संस्था, ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याकडे नोंदणीकृत संस्था आहे. सदर संस्थेचे जागेत ज्या व्यक्ती दफन केले जातात.


काही कारणास्तव नातेवाईका कडून नगर परिषदमध्ये मृत्यु नोंदणी करणे राहून जाते. म्हणून सदर संस्थेच्या माध्यमातून या स्मशानभूमी मध्ये जे मयत दफन केले जातात. त्याच्या मृत्यु व दफन विधी नोंदणी करिता रजिस्टर उपलब्ध केले आहे. व त्या अनुषंगाने संस्थेमार्फत मृत्यु दाखला दिला जातो. आपणास विनंती की जर नजर चुकीने कोणाची मृत्यु नोंदणी राहून गेली असेल तर त्यांची


नोंदणी आमच्या संस्थेच्या मृत्यु दाखल्याच्या आधारे नोंद घेण्यात यावी. नोंदणीमध्ये काही गैर प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाईस आमची संस्था पात्र राहील. तरी सदर विनंतीचा विचार करून नोंद घेण्यात यावी. अशी 

वक्फ संस्था मुसलमानांचे धोरले कब्रस्तान चे 

अध्यक्ष शफी हजरत मुलाणी, 

यांनी  मा. मुख्याधिकारी साहेव पंढरपूर नगर परिषद पंढरपूर याना केली आहे

Post a Comment

0 Comments