जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू
हिंगोली जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू
हिंगोली, (शेख इमामोद्दीन ) दि. 31 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त चालू आहे. दि. 31 डिसेंबर 2021 रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असून लोक नववर्षाचे स्वागत करतात. यावेळी सर्व समाजातील लोक नववर्ष मोठ्या प्रमाणात व जल्लोषाने साजरा करतात. दि.1 जानेवारी, 2022 रोजी भीमा कोरेगाव अनुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी पासून हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारातील समस्त कर्मचारी यांनी सामुहिक संप पुकारलेला आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करुन घेणार नाहीत तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा ईशारा दिला आहे. तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 27 डिसेंबर, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 11 जानेवारी, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये ज
0 Comments