पोलीस स्टेशन कासार शिरसी येथे उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डचा सत्कार: सपोनि रियाज शेख*

 *पोलीस स्टेशन कासार शिरसी येथे उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डचा सत्कार: सपोनि रियाज शेख*





मा.पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे सर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे सर मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश कुमार कोल्हे सर यांच्या  मार्गदर्शन खाली पो.स्टे. कासार शिरसी येथे मागील एक महिन्यापासून परीक्षा बंदोबस्त व इतर यात्रा बंदोबस्त कामी हजर झालेले 19 होमगार्ड कर्तव्य बजावीत होते.


मोठे सण, यात्रा आणि परीक्षा बंदोबस्त कामी पोलीस स्टेशनचे पोलीस मनुष्यबळ हे कमी पडत असल्याने पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड यांना पाचारण करण्यात येते. होमगार्ड हे सदर कालावधीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावीत असतात. 

ते सुद्धा दिवस आणि रात्रपाळी मध्ये पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त आणि इतर ड्युटी करतात. कासार शिरसी पोलीस स्टेशन येथे हजर झालेले होमगार्ड यांना आज रोजी कार्यमुक्त करणे असल्याने मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या होमगार्ड ची यादी बनवण्यासाठी पाच पोलिस अंमलदार यांना API रियाज शेख  यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे पाच पोलिस अंमलदार यांच्या टीमने मागील महिन्याभराच्या कालावधीत 1.वेळेवर हजर राहणे 2.सतर्कपणे ड्युटी करणे 3.चांगला गणवेश परिधान करणे 4. कर्तव्य पूर्ण होईपर्यंत आपला पॉईंट न सोडणे 5.वरिष्ठांचे आदेश पाळणे इत्यादी बाबींमध्ये चांगली आणि शिस्तबद्ध कामगिरी करणारे खालील प्रमाणे तीन होमगार्ड निवडले गेले.  

*1. सटवा उर्फ लक्ष्मण तुकाराम जगदाळे* 

*2.संजीव बाबुराव कलकिरे*  

*3. दत्ता सत्यवान बाभळसुरे*


सदर चांगली कामगिरी करणारे होमगार्ड यांना भविष्यात अशीच कामगिरी करत राहण्याकरिता प्रेरणा मिळावी व इतर होमगार्डना सुद्धा चांगल्या कामगिरीची प्रेरणा मिळावी म्हणून वरील तीनही होमगार्ड यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी शाल, श्रीफळ, हार व फेटा बांधून उचित सत्कार केला व पोलीस स्टेशनला झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात होमगार्ड यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

सदर पोलीस स्टेशन कासार शिरसी यांनी होमगार्ड यांच्या केलेला सत्कार बद्दल होमगार्ड यांनी आभार मानले व यातून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments