दैनिक केसरी मराठा' दैनिक केसरी गर्जने वृत्तपत्रचे विश्वास केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त लोकमान्य टिळकांचे पणतू.आदरणीय डॉ. दीपक जी टिळक यांचे निधन
दैनिक केसरी मराठा' दैनिक केसरी गर्जने वृत्तपत्रचे विश्वास केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त लोकमान्य टिळकांचे पणतू.आदरणीय डॉ. दीपक जी टिळक यांच्या निधनाची वार्ता आज सकाळी आम्हाला समजले आणि त्यांच्या आठवणीने डोळ्याच्या कडा पाणवल्या. डॉक्टर दीपक जी टिळक हे वृत्तपत्रकारितेच्या क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठ शांत संयमी देशभक्त अशा वृत्तस्त जीवनाचा अंत झाला .! डॉ. दीपक जी टिळक यांच्या आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. दैनिक केसरी गर्जने सोलापूर आवृत्ती च्या विविध कार्यक्रमाने बैठकांच्या निमित्ताने त्यांच्याशी मनमोकळी चर्चा होत असे. वर्ष 1993 मध्ये झालेल्या महा विनाशकारी भूकंपानंतर त्यांनी आम्हाला भूकंपग्रक क्षेत्रातील बदलते जनजीवन आणि परिणाम याविषयी पत्रकार म्हणून आणि अवलोकन करून अभ्यासपूर्ण पद्धतीने लिखाण करावे !असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कठीण विषयावर आम्हाला लेखन करता आले आमच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दैनिक गुणधर्मा संस्थापक संपादक.आदरणीय स्व. नाना.हचाटे. स्व. रंगां अण्णा जी वैद्य.
आदरणीय टिळक यांचा मोलाचा वाटा आहे ..
वृत्तपत्रकारितेच्या क्षेत्रातील ते एक चालते बोलते विद्यापीठ !!थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळकांच्या स्वाभिमानी देशभक्तीच्यापदपथावरून प्रामाणिकपणे वाटचाल केली. कुठेही तडजोड केली नाही. लोकमान्य यांचे वंशज हा जाज्वल्य देशप्रेमाचा वारसा लाभलेले डॉ. दीपक टिळक यांनी आपल्या स्वतंत्र कार्यशाळेतून आपले पत्रकारित्यचे क्षेत्रात टिळकांचे देशाभिमानी लोकजागर कायम ठेवला. त्यांच्या जाण्यामुळे आम्हाला त्यांच्या भूतकाळातील आठवणी आज समोर येत आहेत. डॉ. दीपक जी हे ( पुणे )येथील दैनिक केसरी वाड्यात कायमस्वरूपी वास्तव्यास होते. कामानिमित्ताने ते सोलापूर येथे दैनिक केसरी गर्जेने कार्यालयात येत असत !आम्हाला वेळोवेळी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अलीकडेही त्यांच्या आठवणी अधून मधून आम्हाला येत असत. त्यांची असणे यामुळे आमच्या मनाला कधी रितेपण जाणवले नाही. मात्र त्यांच्या जाण्यामुळे आम्हाला आता पुण्यातील केशरी वाड्यात ते नाहीत नसणार आहेत नाहीत. हे अत्यंत दुःखद घटनेमुळे आम्हाला दुःखा श्रु आवरणे कठीण होत आहे. लोकमान्य टिळकांच्या वर्तस्त कार्याच्या देशाभिमानी पद पदावरून प्रतस्तपणे त्यांनी वाटचाल केली केसरी आणि मराठा संस्थेच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महान व्यक्तींचा त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव लोकमान्यच्या नावाचा पुरस्कार म्हणजे फार मोठा सन्मान फार मोठा आदर फार मोठी जबाबदारी मोठेपणा जबाबदारी आणि देशभक्त अशा विविध अंगाने समर्थ असणारा हा पुरस्कार म्हणजे. भारतीय वृत्तपत्रकारितेच्या क्षेत्रात एक आदर्श उदाहरण म्हणता येईल.
त्यांच्या कुशल अभ्यासू मार्गदर्शनाखाली लोकमान्य यांचे प्रथम दैनिक केसरी त्यानंतर राज्यात आवृत्ती जशी की दैनिक केसरी गर्जने (सोलापूर )दक्षिण महाराष्ट्र केसरी( सांगली )दैनिक केसरी (चिपळूण) दैनिक केसरी (अहमदनगर )आवृत्ती अशा स्वतंत्र आवृत्ती काढून त्यांनी लोकमान्य देशभक्तीपर विचार दररोज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आहेत.
त्यांच्या पश्चात ही हा सर्व व्याप त्यांचे चिरंजीव रोहित टिळक हे समर्थपणे पुढे नेतील .चालवतील .असा हा सर्वांनाच विश्वास आहे सार्थपणे चालवतील. चालते बोलते टिळक विद्यापीठ आज मौन झाले !! आज काल लोकांना वृत्तस्थ आणि त्यागी जीवन रुचत नाही!!त्यांचा अंत्यविधी शासनाच्या वतीने करण्यात यावा असे आम्हा प्रमाणिक पत्रकारितेला वाटते! टिळकपरिवाराच्या. दुःखात आम्ही सहभागी आहोत! डॉ. दीपक जी यांच्या मृत आत्म्याला सद्गती लाभो!! अशी आमची श्री परमेश्वर चरणी प्रार्थना !जय हिंद ,,
-विलास कुलकर्णी
जेष्ठ पत्रकार औसा
माजी.वार्ताहर
दैनिक केसरी गर्जने (सोलापूर)
95 52 19 72 68.
0 Comments