85 व्या वार्षिक महोत्सवात हिरेमठ संस्थान मध्ये हजारो शिवभक्तांनी घेतली दीक्षा

 85 व्या वार्षिक महोत्सवात हिरेमठ संस्थान मध्ये हजारो शिवभक्तांनी घेतली दीक्षा 





औसा प्रतिनिधी 

हिरेमठ   संस्थानचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी 85 वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक महोत्सवाची परंपरा अखंड कायम असून 15 जुलैपासून अखंड शिवनाम सप्ताह, सिद्धांत शिखामणी तत्त्वामृत ग्रंथाचे पारायण, ईसष्टलिंग महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉ. श्री शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थांनचे पिठाधिपती बाल तपस्वी गुरू निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात वेदमूर्ती चंद्रशेखर हिरेमठ यांच्या मंत्रोच्चारामध्ये सोमवार दिनांक 21 जुलै रोजी हजारो महिला पुरुष व तरुणांनी भव्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधिवत शिव दीक्षा घेतली. हिरेमठ संस्थानच्या माध्यमातून धर्म जागृतीचे कार्य अविरतपणे सुरू असून या संस्थांनला ज्ञानपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मानेच विश्वाला शांती मिळेल म्हणून संस्थांनच्या धर्म जागृती कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

           सोमवार दिनांक 21 जुलै रोजी आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते 40 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी हिरेमठ संस्थांनच्या भक्तनिवासासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सचिन उटगे, वैजनाथ शिंदुरे, सचिव अमर उपासे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिरेमठ संस्थांच्या माध्यमातून धर्म जागृतीच्या कार्यासोबतच महोत्सव कालावधीमध्ये एक महिना सुरू असलेल्या अन्नदानाच्या सेवेचे भक्तगणातून कौतुक होत आहे महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हिरेमठ संस्थान औसा, वीरशैव समाज औसा आणि वीरशैव युवक संघटना पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments