प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मार्फत जन औषधी दिवस गांधी चौकात सप्ताह साजरा
लातूर- प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र मार्फत जन औषधी दिवस लातूर शहरातील गांधी चौकात सोमवारी साजरा करण्यात आला.
प्रधानमंत्री जन औषधि दिवस शहरातील गांधी चौकात एकूण मधुमेहाच्या एकूण यावेळी १०० मोफत तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमास डॉ. चंदशेखर आष्टेकर, जिल्हा रुग्णालयातील पॅथालॉजीस्ट डॉ. सुमित कामठनवार,लातूर केमिस्ट ड्रगिस्ट अशोशियनचे अध्यक्ष रामदास भोसले व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश रेडडी,राजकुमार राजारूपे,म.न.पा. लातूर चे भाजपा माजी नगर सेवक शैलेश स्वामी, माझी नगरसेवक हरीभाऊ गायकवाड व शहरातील नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे व औषध निरिक्षक सचिन बुगड यांची प्रमुख उपस्थिती होती . या प्रसंगी जेनरिक औषधाचा प्रसार होण्यासाठी डॉ. आष्टेकर हे मोठया प्रमाणात जेनरीक औषधे डॉकटर लिहून रुग्णांना देत असल्याने त्यांचा सत्कारकरण्यात आला. या प्रसंगी राजारुपे राजकुमार मालक मे. भारतीय जन औषधी केंद्र, लातूर यांनी मान्यवराचा सत्कार केला.
या कार्यक्रमात जेनरीक औषधी नियमीत घेणारे जेष्ट नागरीक बापुराव अंबेकर व श्रीमती प्रभावती कोरवाड यांचाही शाल व श्रीफळ देवून प्रशासनकडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन, लातूर यांच्या कडून जनेरीक औषधीचा प्रसार करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त पोंगळे यांनी केले.राजकुमार राजारुपे यांनी गेल्या सात वर्षापासून जेनरीक औषधीचा सुरळीत पुरवठा करुन लातूरच्या रुग्णांची गरज भागविल्या बद्दल त्यांचाही सत्कार लातूरच्या अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आला. व त्यांनी त्यांची सेवा अशीच अखंडीत सुरु ठेवण्याबाबत प्रशासनाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मोफत मधुमेह तपासणीचे शिबिर घेण्यात आले.यामध्ये १०० नागरिकांचे मधूमेह तपासणी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश रेडडी यांनी केले तर आभार राजकुमार राजारूपे यांनी मानले.
0 Comments