मदतीचा हाथ-सोशल ची साथ उपक्रमास सुरवात

 मदतीचा हाथ-सोशल ची साथ उपक्रमास सुरवात.





औसा(प्रतिनिधी)सोशल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी च्या सामाजिक उपक्रम सेवेचे हे आठवे वर्ष असून सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आजही अव्याहतपणे सुरू आहे.गरजू लोकांना मदत करण्याचे काम यापुढेही अविरत चालूच राहणार आहे असे प्रतिपादन सोशल चे सचिव इंजि.अजहर हाश्मी यांनी महाराष्ट्र रिपोर्टर शी संवाद साधताना सांगितले.सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी औसा यांनी आतापर्यंत सर्वधर्मीय गरीब आणि गरजवंताना सुमारे 2000 राशन किट आणि गेल्या सात वर्षांत सुमारे 2575 रमजान राशन किटचे वाटप केले आहेत.सोशल तर्फे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या कांही गरीब मुलांच्या फीसाठी मदत,निराधार प्रवासी यांना मदत,उत्तर प्रदेश बाराबंकी येथील 117 लोकांना 6 महिन्यांसाठी राशन वाटप,गरीब आणि अनाथ मुलींच्या लग्नासाठी मदत,गरजूंना हॉस्पिटल आणि औषधासाठी मदत,गरजू रोजंदारी मजुरांना व्यवसायासाठी मदत आता पर्यंत निःस्वार्थ भावनेने केली आहे.आता रमजानचा महिना सुरू असून मदतीच्या मागण्याही येत आहेत.याच धर्तीवर रमजान महिन्यात राशन किटची तयारी करण्यात आली आहे.तरी गरीब,गरजूंवंताना मदत व्हावी म्हणून दानशुर व्यक्तींनी लवकरात लवकर आपली जकात,सदका देणगीची रक्कम अभियंता अझहर हाश्मी

 मो.9860601536 व अ‍ॅड.इकबाल शेख मो.9545253786 या संपर्क क्रमांक वर जमा करावी असे आवाहन सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments