गॅस एजन्सी कडुन होणारी लूट थांबवा.
सोलापूर (प्रतिनिधी) घरपोच गॅस सिलिंडर देण्यासाठी अतिरिक्त पैसे उकळून ग्राहकांची लूट करणार्या गॅस एजन्सी व सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या डिलेव्हरी बॉय वर तात्काळ कडक कारवाई करण्याबाबत चे निवेदन जिल्हा पुरवठा वितरण अधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले.
सध्याच्या काळामध्ये गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले असताना सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर घेणे मुश्किल झाले आहे अशातच गॅस एजन्सी कडून घरपोच गॅस सिलेंडर पोहोच देण्याच्या नावाखाली 20 ते 40 रुपये एजन्सीच्या डिलिव्हरी बॉय कडून प्रति सिलेंडर मागे ग्राहककडून उकळले जात आहे. गॅस एजन्सीच्या संमतीने ग्राहकांकडून हे डिलेव्हरी बॉय अतिरिक्त पैशाची लूट करीत आहे
गॅस एजन्सी मधून निघणाऱ्या सिलेंडरच्या बिलातच घरापर्यंत पोहोचवण्याचे भाडे समाविष्ट केलेले असते तरी गॅस एजन्सी चे डिलिव्हरी बॉय कडून घरपोच देण्यासाठी 20 ते 40 रुपयांपर्यंत अतिरिक्त रकमेची मागणी केली जात आहे जर ती रक्कम नाही दिल्यास हे कर्मचारी वाद घालतात आणि एजन्सी मधून गॅस सिलेंडर घेऊन जावा अशी भाषा करतात. सध्या शासनाने रॉकेल सुद्धा बंद केलेले आहे सिलेंडर नाही मिळाल्यास गृहिणींना फार अडचणींचा सामना करावा लागतो स्वयंपाक करण्यासाठी रॉकेल उपलब्ध नाही मग आम्ही स्वयंपाक कसा करावा या चिंतेपोटी नाईलाजाने सिलेंडर साठी डिलेव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. ग्राहकास गॅस सिलिंडर वजन करून देणे बंधनकारक असताना देखील डिलेव्हरी देणार्याकडे वजनकाटा उपलब्ध नसतो आधीच सिलेंडरच्या दराने हजारी पार केली असून सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्ण कोलमडले आहे त्यामुळे गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉय कडून होणाऱ्या लुटीला नागरिक वैतागलेले असून सोलापुरात घरगुती गॅसचे दर 1110 असताना गॅस एजन्सी चे डिलिव्हरी बॉय ग्राहकाकडून 1150 रुपयाची मागणी करीत आहेत सोलापूर शहरातील सर्वच गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉय कडून ही लूट सरसपणे चालू आहे दिवसाला हजारो सिलेंडर टाक्याचे वितरण करण्यात येते
जुळे सोलापुरातील एका गॅस एजन्सी डिलिव्हरी बॉय ने अनेक ग्राहकाकडून टाकी आणि सिलेंडरचे पैसे गायब केले आहेत याबाबत गॅस एजन्सी तक्रार केली असता एजन्सी व्यवस्थापनाने त्याचा आमच्या काही संबंध नाही तुम्ही पोलिसात तक्रार करा असा सल्ला दिला आहे पोलिसाकडे तक्रार केली असता पोलिसांनी तक्रार ची नोंद न घेता दोन चार दिवस वाट बघा नंतर तक्रारीला या असे सांगितले आहे तरी आपण तात्काळ अशा गॅस एजन्सीवर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर शहर सचिव रमेश चव्हाण राजेंद्र माने धनंजय लामकाने माजी सभापती उत्तर सोलापूर आदी उपस्थित होते
0 Comments