तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील समोर जवाब दो मोदी आंदोलन
औसा प्रतिनिधी
2019 च्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यातील 44 सैनिक शहीद झाले या घटनेमध्ये केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. असे वक्तव्य करणाऱ्या सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले. भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता काना करण्यात आली पुलवामा घटनेत वापरलेले 300 किलो आरडीएक्स कुठून आले. पुलवामा घटनेत 44 जवानांचे बलिदान हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते काय मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम जाधव यांनी 300 कोटी रुपयांची ऑफर का दिली. या प्रश्नाचे उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत. या मागणीसाठी असा तहसील समोर तालुका काँग्रेसच्या वतीने जवाब दो मोदी आंदोलन करण्यात आले पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 44 वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपरोक्त प्रश्नांची उत्तरे द्यावीत अन्यथा काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशारा जवाब दो मोदी आंदोलनातून देण्यात आला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायणराव लोखंडे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, विलासराव देशमुख युवा मंचचे रवी पाटील, निर्गुण साळुंखे, ज्ञानोबा जोगदंड, बाळासाहेब सांगळे, हमीद सय्यद, अंगद कांबळे, महबूब कारभारी, अँड एफ एफ पटेल, शेख इस्माईल, शेख पाशा, शफिक सिद्दिकी, आप्पासाहेब घाडगे, श्याम सूर्यवंशी, तानाजी जाधव, गोरख सावंत, सचिन शिंदे,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार भरत सुर्यवंशी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.या आंदोलनात औसा तालूक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments