जकी बागवान व मुस्तफा बागवान
या बंधुंचा रमजानचा पहिला उपवास
सोलापूर- इस्लाम धर्मांतील पवित्र आणि संयम, प्रेम, शांततेचे प्रतीक असणाऱ्या रमजान महिन्याची सुरुवात झाली असून मित्र नगर येथील सलीम अ. कादर बागवान यांचे दोन चिरंजीव जकी सलीम बागवान (वय ८) व मुस्तफा सलीम बावान (वय ६) या दोघे बंधुंनी एकाच दिवशी रमजानचा पहिला उपवास (रोजा) पूर्ण केला. रमजानमध्ये तब्बल महिनाभर कडक उपवास केले जातात. ऐन उन्हाळ्यात यंदा रमजानचे उपवास सुरू झाले असले तरी घरातील मोठ्यापासून ते बालगोपाल यांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. जकी सलीम बागवान हे चांदतारा प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत तर मुस्तफा सलीम बागवान हे याच शाळेत इयत्ता पहेलीत शिकत आहेत. पहाटे अजानच्या अगोदर सहेरी करून दिवसभर अन्न-पाणी न घेता सायंकाळी अजान झाल्यानंतर उपवास सोडला जातो. कमी वयात पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर त्याचा बागवान परिवाराकडून हार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या दोघां बंधूंचे उपवास पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
(Iqbal Bagban)
Mob. No. 9552529277
0 Comments