अ.भा. वारकरी मंडळाच्या कोपरे कॉलनीतील शाखेचा उद्घाटन संपन्न
औसा प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज तसेच लातूर जिल्हा अध्यक्ष लालासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय वारकरी मंडळाची वाटचाल सुरू आहे. तालुका अध्यक्ष खंडू महाराज भादेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 2 कोपरे कॉलनी येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नूतन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी तालुका संघटक गोरोबा कुरे, उपाध्यक्ष गोविंद तावसे, सचिव दगडथपं जोशी तळणीकर, सिद्रामप्पा राचट्टे, सतीश जाधव, नरसिंग राजे कुंभार, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सारिका पवार, सूर्यकांत कुलकर्णी, वीरभद्र कोपरे आदी मान्यवर उपस्थित होते. कोपरे कॉलनी शाखेचे अध्यक्ष म्हणून सौ पुष्पा वीरभद्र कोपरे यांची निवड करण्यात आली. यावेळी खंडू महाराज भादेकर व दगडूपंथ जोशी तळणीकर यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या ध्येय धोरणानुसार पारमार्थिक सेवा कार्य करावे असे आवाहन महिला भजनी मंडळाच्या सदस्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरे कॉलनी शाखेच्या सर्व महिला सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी शिव -हरी महिला भजनी मंडळाच्या सुरेखा गौरीशंकर वागदरे, लुब्जा भागवत माळी, प्रेमा रंगनाथ जाधव, पंचफुला नारायण सूर्यवंशी, कल्पना श्याम कुलकर्णी, सुरेखा बाबासाहेब थोरात, प्रणिता दत्तात्रय थोरात, प्रमिला राम कांबळे, सुरेखा विठ्ठल पोद्दार, शिवकन्या नवनाथ जाधव, शामल सुरेश पवार, राणी नवनाथ, बनसोडे ,आणि लक्ष्मी बालाजी कुरे, विमल विश्वनाथ जाधव यांची उपस्थिती होती.
0 Comments