लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या मुलाने मिळवले आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सुवर्णपदक..*

 *लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या  पोलिसांच्या मुलाने मिळवले आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड  परीक्षेमध्ये सुवर्णपदक..*








          लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रियाज सौदागर यांचा मुलगा मुहम्मद नौमान हा लातूर येथील कृपासदन कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकत असून सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, नवी दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या एस.ओ.एफ.इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये भाग घेत मॅथेमॅटिक्स विषयांमध्ये सुवर्णपदक पटकावले असून त्यांने अंतरराष्ट्रीय स्तरावर 3115 अशी रँक मिळवली आहे.

         आज दिनांक 13/04/2023 रोजी कृपासदन कॉन्व्हेंट स्कूल तर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका च्या हस्ते मुहम्मद नौमान यास प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. त्याचे सर्व स्तरा कौतुक होत असून त्याने यापूर्वीही सदर परीक्षेत सुवर्णपदक मिळवले होते.

           मुहम्मद नौमान याचे वडील लातूर पोलीस दलात बॉम्बशोधक व नाश पथकात कार्यरत असूनत्यांनी यापूर्वी पोलीस स्टेशन औसा येथेही सेवा बजावली आहे.

          ऑलिम्पियाड परीक्षा ही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरांसह अनेक स्तरांवर दिल्या जातात, त्यात शालेय श्रेणीतील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. केवळ इयत्ता 1 ते 12 मधील विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. गणित, विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि इंग्रजी यासह शैक्षणिक विषयांमध्ये विद्यार्थ्यांची आवड वाढवणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

             राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षा अधूनमधून खाजगी आणि सार्वजनिक संस्थांद्वारे देशभरात घेतल्या जातात. गणिताच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी “होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन” चा एक भाग म्हणून 1989 मध्ये ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले होते.

             या चाचण्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे योग्य मूल्यांकन करतात आणि त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करतात. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विचार करण्याच्या क्षमतेवर मूल्यांकन केले जाते.

Post a Comment

0 Comments