अजित पवारांच्या सभेला आमदार आणि शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला.
महाराष्ट्र रिपोर्टर
मुंबई. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे मुंबईत एम इ टी मध्ये व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अनुक्रमे दोन सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
दरम्यान अजित पवार यांच्या गटात केवळ समर्थीत आमदारांची गर्दी झाली मात्र इकडे शरद पवारांच्या सभेत लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.सभागृह बाहेरून. आतून हाऊसफुल्ल झाले होते तुडुंब भरलेल्या या सभागृहात पवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित असलेल्या या सभागृहात ही सभा खुप वेळ चालली उपस्थित असलेल्या प्रत्येक जण चेहरे उत्साहाने संचारले होते . पवारांच्या सभेला यावेळी उदंड प्रतिसाद मिळाला .
मिळालेल्या माहितीनुसार या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 आमदार शरद पवारांच्या बाजुने सहभागी झाले होते
सर्व जिल्हाध्यक्ष विधानपरिषदेचे आमदार नेते उपस्थित होते.
0 Comments