बाप रे बाप खेकङा शेती ते हि औसा तालुक्यातील भादा गावात
बातमी वहाब पठान यांच्या कडून
आजवर आपण ऊस , कापूस , सोयाबीन, तूर , रेशीम शेती बद्दल ऐकलं असेल पण लातूर जिल्ह्यातील भादा गावात सोमनाथ प्रभू पाटील या शेतकरी तरूणाने आता आपला शेतात खेकङा शेती करण्यास सूरूवात केली आहे. एवढेच नाही तर आपला हा खेकङा शेतीचा प्रयोग लातूर- उस्मानाबाद नाही तर संपूर्ण मराठवाङ्यात पहीला प्रयोग असल्याचा दावा या तरूण शेतक-याने केला आहे .
काळाच्या प्रवाहा बरोबर शेतीत यांत्रीकीकरणा बरोबरच आजवर अनेक बदल झाले आहेत. आजवर ऊस शेती , कापूस शेती , तूतीची रेशीम शेती , दूग्ध व्यवसायाची शेती , मत्स्य शेती आपण पाहीली आहे . मात्र लातूर जिल्ह्यातील भादा गावात सोमनाथ प्रभू पाटील या शेतकरी तरूणाने चक्क आपल्या शेतात खेकङा शेती करण्यास सूरूवात केली आहे. एवढेच नाही तर केवळ लातूर - धाराशिव च नाही तर संपूर्ण मराढवाङ्यात आपला हा खेकङा शेतीचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा या शेतकरी तरूणाने आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना केला आहे. विशेष म्हणजे या शेतकरी तरूणाना गोपालनाचा दूग्ध व्यवसाय पण आहे. असे असताना खेकङा शेतीची कल्पना कशी सूचली असे विचारले असता ज्ञानेश्वर बाबूराव लटूरे या मित्राने मला खेकङा शेतीची कल्पना सूचवली व ती मला आवङली त्यानंतर मी याबाबत यूट्यूब चॅनलवर खेकङा शेतीचा अभ्यास केला व प्रत्यक्षात पूणे येथे खेकङा शेतीला भेट दिली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून शंभर किलो खेकङे आणून या व्यवसायास प्रारंभ केला असल्याचे सोमनाथ प्रभू पाटील यांनी सांगीतले . या खेकङा शेतीसाठी त्यांनी स्वतःच्या शेतीत पंधरा बाय वीस फूट रूंद व अकरा फूट उंचीचा पाण्याचा हौद बांधला असून त्यात या खेकङा पालणास सूरूवात केली आहे . लातूर जिल्ह्यात भादा येथील या शेतकरी तरूणाने सूरू केलेला हा खेकङा शेतीचा प्रयोग एक कूतूहलाचा विषय ठरला असून अनेक शेतकरी या शेतीस भेट देत आहेत.
हि शेती का करावी वाटली असे विचारले असता त्यांनी सांगीतले कि....
" मी आजवर शेळीपालन , गोपालन , सह दूग्ध व्यवसाय हि केला मात्र अनेक शेतीशी निगङीत व्यवसायात प्रचंङ भांङवल , स्पर्धा आहे . आणी अशा पारंपारिक व्यवसायाला बाजू देवून आपण नवीन काहीतरी केले पाहीजे . हा उद्देश मनात ठेवून आपण खेकङा शेतीचा प्रयोग शेतात चालू केला.असल्याचे सोमनाथ प्रभू पाटील या तरूण शेतक-यांनी महाराष्ट्र रिपोर्टर शी बोलताना सांगितले.
या व्यवसायामुळे गावात एकच चर्चा सुरु आहे
0 Comments